Rajasthan Political Crisis: राजस्थानात काँग्रेसचाच 'आवाssज'; अशोक गहलोत सरकारने 'विश्वास' जिंकला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 04:24 PM2020-08-14T16:24:37+5:302020-08-14T16:37:32+5:30

आजपासून सुरु झालेल्या राजस्थान विधानसभेत भाजपाने काँग्रेस सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला होता

Rajasthan: Ashok Gehlot led Rajasthan Government wins vote of confidence in the State Assembly | Rajasthan Political Crisis: राजस्थानात काँग्रेसचाच 'आवाssज'; अशोक गहलोत सरकारने 'विश्वास' जिंकला!

Rajasthan Political Crisis: राजस्थानात काँग्रेसचाच 'आवाssज'; अशोक गहलोत सरकारने 'विश्वास' जिंकला!

Next
ठळक मुद्देराजस्थानातील राजकीय सत्तासंघर्ष संपुष्टात मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मारली बाजी विश्वासदर्शव ठराव जिंकून काँग्रेसने भाजपाला फटकारलं

जयपूर – गेल्या अनेक दिवसांपासून राजस्थानात सुरु असलेल्या सत्तासंघर्ष नाट्यावर पडदा पडलेला आहे. माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि समर्थकांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधात बंड पुकारलं होतं. त्यानंतर राजस्थानात काँग्रेस सरकारवर टांगती तलवार होती. सचिन पायलट यांची काँग्रेसने उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी केली होती.

आजपासून सुरु झालेल्या राजस्थान विधानसभेत भाजपाने काँग्रेस सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला होता. मात्र मुख्यमंत्री अशोक गहलोत(Ashok Gehlot) यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकत भाजपाला जोरदार झटका दिला आहे. जवळपास महिनाभर चाललेल्या राजकीय अनिश्चिततेनंतर पक्षश्रेष्ठींनी सचिन पायलट यांची समजूत काढल्याने राजस्थानमधील राजकीय नाट्य संपुष्टात आले होते. मात्र राजस्थानमध्ये सारे आलबेल झाले असे वाटत असतानाच भाजपाने खेळलेल्या एका चालीमुळे राज्यातील राजकारणात नवा ट्विस्ट आला होता. राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय भाजपाने घेतला होता. मात्र सरकारविरोधातील अविश्वास ठराव भाजपा हरलं आहे.

राजस्थानमधील राजकीय संघर्ष

मुख्य विरोधी पक्ष भाजपाने सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या घोषणा केली होती. विधानसभेचे अधिवेशन सुरू होण्याच्या फक्त एक दिवस आधी सत्ताधारी कॉंग्रेसचे आमदार आणि मित्रपक्षांची बैठक झाली, भाजपा आणि तेथील घटक पक्षांचीही बैठक झाली होती. दरम्यान, कॉंग्रेसने आपले दोन आमदार विश्वेंद्रसिंग आणि भंवरलाल शर्मा यांचे निलंबन रद्द केले होते. गुरुवारच्या दिवशीचा सर्वात महत्वाचा क्षण म्हणजे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची भेट झाली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन नेत्यांनी जवळपास एक महिन्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केले होते. गहलोत आणि पायलट यांच्यासमवेत कॉंग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, पक्षाचे प्रदेश प्रभारी अविनाश पांडे आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग डोटासरा हे होते. यानंतर कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक मुख्यमंत्री निवासस्थानी झाली होती, त्यात गहलोत, पायलट तसेच कॉंग्रेस व त्यांचे समर्थक आमदारही हजर होते.

सचिन पायलटांचं बंड थंड करण्यात काँग्रेसला यश

'मी कधीही कुठल्याही पदाबाबत बोललो नाही. मी कुठल्याही पदाची मागणी केली नव्हती. मात्र आत्मसन्मानासाठी ही लढाई सुरू होती. माझ्या मनात कुठल्याही व्यक्तीबाबत द्वेषभावना नाही. आता पक्ष मला जी जबाबदारी देईल, ती मी सांभाळेन, असं सांगत सचिन पायलट यांनी बंडाचं निशाण थंड केले. तसेच आधी काय झालं आणि पुढे काय होईल, याबाबत मी काही सांगू शकत नाही. माझ्यासाठी काही अशा शब्दांचा वापर केला गेला. ज्यामुळे मला वाईट वाटले. मात्र मी हा कडवट घोट प्राशन केला आहे. राजकारणामध्ये शब्दांचा जपून वापर केले गेला पाहिजे. कारण जनता आपले म्हणणे ऐकत असते. जेव्हा मी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष होतो. तेव्हा माझ्यात सगळे गुण होते. मात्र आता मी निरुपयोगी झालोय, अशा शब्दात पायलट यांनी त्यांच्याविरोधातील वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती.

अशोक गहलोत ठरले किंग

सचिन पायलट यांच्या बंडाला मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनीही कडवं आव्हान दिलं होतं. पायलटांचे अनेक समर्थक पुन्हा घरवापसी करत असल्याने सचिन पायलट एकटे पडत होते. त्यानंतर पक्षश्रेष्ठींशी बोलून पायलटही घरवापसीवर तयार झाले. या सर्वात महत्त्वाची भूमिका असणारे अशोक गहलोत राजस्थानात खऱ्याअर्थाने किंग ठरलेत. पायलट यांच्या घरवापसीनंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले होते की, राजस्थानमध्ये जे घडले तो आता इतिहास झाला. तसेच पक्षात परत आलेल्यांच्या अडचणी दूर करु, त्याचप्रमाणे सीबीआय, ईडीचा गैरवापर करण्यात येत आहे. धर्माच्या नावाखाली राजकारण केले जात आहे. मात्र असं असलं तरी आमचं सरकार ५ वर्ष पूर्ण करेल आणि आम्ही पुढील निवडणूक देखील जिंकू, असा दावा अशोक गहलोत यांनी केला होता.

 

Read in English

Web Title: Rajasthan: Ashok Gehlot led Rajasthan Government wins vote of confidence in the State Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.