Sachin Pilot: राजस्थानमध्ये मोठ्या हालचाली! सचिन पायलट अचानक दिल्लीत; गेहलोतांच्या घरी जमवाजमव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 10:03 PM2021-07-27T22:03:40+5:302021-07-27T22:04:36+5:30

Rajasthan Cabinet Reshuffle: काँग्रेसच्या आमदारांना आणि मंत्र्यांना फोन करून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलविण्यात येत आहे. काँग्रेसचे राजस्थान प्रभारी अजय माकन यांचा दौरा आहे. ते येण्याआधीच राजस्थानमध्ये वातावरण तापू लागले आहे.

Rajasthan Cabinet Reshuffle: Sachin Pilot suddenly came in Delhi; minister, mla's Gather at Ashok Gehlot's house | Sachin Pilot: राजस्थानमध्ये मोठ्या हालचाली! सचिन पायलट अचानक दिल्लीत; गेहलोतांच्या घरी जमवाजमव

Sachin Pilot: राजस्थानमध्ये मोठ्या हालचाली! सचिन पायलट अचानक दिल्लीत; गेहलोतांच्या घरी जमवाजमव

Next

Rajasthan Politics: पंजाबमधील राजकीय सुंदोपसुंदी शमत नाही तोच शेजारच्या राजस्थानमध्ये मोठ्या हालचाली होऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या घरी आमदार मंत्र्यांनी जमण्यास सुरुवात केली असून सचिन पायलट (Sachin Pilot) अचानक दिल्लीत गेल्याने चर्चांना उधान आले आहे. महत्वाचे म्हणजे पायलट यांचे याआधीचे बंड फुकट गेले होते. (Cabinet Reshuffle in Rajasthan Government soon; Sachin Pilot in Delhi.)

काँग्रेसचेराजस्थान प्रभारी अजय माकन यांचा दौरा आहे. ते येण्याआधीच राजस्थानमध्ये वातावरण तापू लागले आहे. माकन येण्याआधीच सचिन पायलट यांनी दिल्ली गाठत काँग्रेसचे महासचिव के सी वेनुगोपाल यांची भेट घेतली आहे. दुसरीकडे गेहलोत यांच्या निवासस्थानी अचानक मंत्री आणि आमदार जमू लागले आहेत. (Sachin Pilot in Delhi to meet KC venugopal.)

राजस्थानमध्ये गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यामध्ये बऱ्याच काळापासून विस्तवही जात नाहीय. त्यांच्यातील मतभेद संपल्याचे संकेत माकन आणि वेणुगोपाल यांच्या आधीच्या जयपूर दौऱ्यात देण्यात आले होते. गेहलोत यांनी सोनिया गांधींचा जो निर्णय असेल तो मान्य असेल असे म्हटले होते. सोनिया गांधींचाच संदेश घेऊन माकन जयपूरला येणार आहेत. त्याआधीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. 

काँग्रेसच्या आमदारांना आणि मंत्र्यांना फोन करून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बोलविण्यात येत आहे. गेहलोत यांच्या घरी सध्या ममता भूपेश, राजेंद्र यादव आणि भजनलाल जाटव हे मंत्री आहेत. तर पायलट गटाचे आमदार मुरारी मीणा देखील गेहलोत यांना भेटण्यासाठी आले आहेत. काही अपक्ष आमदारांनीही हजेरी लावली आहे. 

दिल्ली हायकमांडने दोघांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. यामुळे मंत्रिमंडळात नवे मंत्री घेताना काही जुन्या मंत्र्यांना बाहेर केले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी शकुंतला रावत देखील पोहोचल्याचे समजते आहे. याचबरोबर मुरारी, महेंद्रजीत यांनाही मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Rajasthan Cabinet Reshuffle: Sachin Pilot suddenly came in Delhi; minister, mla's Gather at Ashok Gehlot's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.