राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाळीची चाहूल, पायलट गटाच्या ज्येष्ठ आमदाराने दिला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 05:12 PM2021-05-18T17:12:42+5:302021-05-18T17:18:09+5:30

Rajasthan Politics News: राजस्थान काँग्रेसमधील सचिन पायलट गटातील नेते माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार हेमाराम चौधरी य़ांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

Rajasthan Congress rebels again, senior MLA Hemaram Chaudhary of Pilot group resigns | राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाळीची चाहूल, पायलट गटाच्या ज्येष्ठ आमदाराने दिला राजीनामा

राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाळीची चाहूल, पायलट गटाच्या ज्येष्ठ आमदाराने दिला राजीनामा

Next

जयपूर - गेल्या काही महिन्यांपासून शांत असलेल्या राजस्थानमध्ये पुन्हा एकदा राजकीय वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. राजस्थानकाँग्रेसमधीलसचिन पायलट गटातील नेते माजी मंत्री आणि काँग्रेस आमदार हेमाराम चौधरी य़ांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. (Politics news of rajasthan) बाडमेरमधील गुडामालानी विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे आमदार असलेल्या हेमाराम चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांना आपला राजीनामा पाठवला आहे. (Rajasthan Congress rebels again, senior MLA Hemaram Chaudhary of Pilot group resigns)

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेले हेमाराम चौधरी दीर्घकाळापासून पक्षात नाराज होते. गतवर्षी झालेल्या राजकीय नाट्यावेळी ते मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या विरोधी गट असलेल्या सचिन पायलट गटासोबत होते. दरम्यान, हेमाराम चौधरी यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर राजस्थानमधील राजकीय पारा एकदम वाढला आहे. मात्रा आतापर्यंत याबाबत चौधरी यांचे मत समोर आलेले नाही. मात्र त्यांनी विधानसभा अध्यक्षांना पाठवलेला राजीनामा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 
 
पक्षाचे ज्येष्ठ नेते असूनही हेमाराम चौधरी यांना अशोक गहलोत सरकारमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. तेव्हापासून ते नाराज असून, ते अनेकदा आपली नाराजी जाहीर करत आहेत. हेमाराम चौधरी यांनी प्रादेशिक विकासकार्यांमध्ये भेदभाव केल्याचा आरोप गहलोत सरकारवर केला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेमध्ये चौधरी यांनी आपल्या सरकारवर जाहीर टीका केली होती. त्यांच्या मतदारसंघात विकासकामे होत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. 

विधानसभेत बोलताना चौधरी यांच्या मनातील सल उघड झाली होती. तेव्हा ते म्हणाले होते की, वैर घ्यायचे असेल तर ते माझ्याशी घ्या. या प्रदेशातील जनतेला त्रस्त करू नका. चौधरी यांनी त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील हटवण्यावरूनही नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चौधरी यांनी १४ फेब्रुवारी २०१९ रोजीही राजीनामा दिला होता. मात्र तेव्हा विधानसभा अध्यक्षांनी हा राजीनामा स्वीकारला नव्हता.

Web Title: Rajasthan Congress rebels again, senior MLA Hemaram Chaudhary of Pilot group resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.