जयपूर – राजस्थानमध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर अखेर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाष्य केले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करुन मोदी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. कोरोना संक्रमण काळात भाजपा काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत कोरोना काळात सरकारचं यश सांगत त्यांनी ट्विट केले आहे
या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी लिहिलं आहे की, फेब्रुवारी – नमस्ते ट्रम्प, मार्च – मध्य प्रदेशात सरकार पाडलं, एप्रिल – मेणबत्ती पेटवली, मे – सरकारला ६ वर्ष पूर्ण, जून- बिहारमध्ये व्हर्चुअल रॅली, जुलै – राजस्थानमध्ये सरकार पाडण्याचं षडयंत्र यामुळे देश कोरोनाच्या लढाईत आत्मनिर्भर आहे अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. राजस्थानात सुरु असलेल्या संघर्षात राहुल गांधींनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे.(Rahul Gandhi)
मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्या वादामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी पाहायला मिळाली. सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थक १९ आमदारांवर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची इच्छा होती तर सचिन पायलट यांची समजूत काढण्याची केंद्रीय नेतृत्वाची इच्छा होती. गहलोत यांनी कारवाई करुन सचिन पायलट यांना मंत्रिमंडळातून आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवलं. त्याचसोबत सचिन पायलट यांच्यावर सरकार पाडण्याचा गंभीर आरोप लावला.(Rajasthan Political Crisis)
तर सूत्रांच्या माहितीनुसार स्वत: प्रियंका गांधी सचिन पायलट यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पायलट यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ज्या 'निरुपयोगी आणि नाकारलेल्या' प्रदेशाध्यक्षांना इतका आदर दिला गेला होता, तोच पक्षाच्या पाठीवर वार करण्यास तयार होता. त्याचवेळी राजस्थानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे आमदार गिरजसिंग मलिंगाने सोमवारी असा आरोप केला की, तत्कालीन उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी त्यांना काँग्रेस सोडून भाजपात येण्याची ऑफर दिली होती. त्यासाठी कोट्यवधीचं लालच पण देण्यात आली असा गंभीर आरोप केला मात्र हा आरोप तथ्यहीन आणि खोटा असल्याचं पायलट यांच्याकडून सांगण्यात आलं.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
मृत्यूचं तांडव! १५ दिवसांत आईसह ५ मुलांचा मृत्यू; हसतं-खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
दिलासादायक! ‘ही’ कंपनी भारतात ऑक्सफर्डच्या लसीची क्लिनिकल चाचणी सुरु करणार
क्षुल्लक कारणावरुन दोन मित्रांची गळा दाबून हत्या; दुहेरी हत्याकांडानं गावात दहशतीचं वातावरण