Rajasthan Political Crisis: शिंदे नव्हे तर ‘रेड्डी पॅटर्न’नं बंडखोर नेते सचिन पायलट काँग्रेसला टक्कर देणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 02:19 PM2020-07-15T14:19:18+5:302020-07-15T14:20:11+5:30

Rajasthan Political Crisis: ज्योतिरादित्य शिंदेप्रमाणे भाजपात जाणार नाहीत, ज्या भाजपाविरोधात संपूर्ण राजकारण केले त्यांच्यासोबत कसं जाणार असा सवाल सचिन पायलट यांनी उपस्थित केला.

Rajasthan Political Crisis: Sachin Pilot Will Defeat Congress Through Jagan Mohan Reddy Formula | Rajasthan Political Crisis: शिंदे नव्हे तर ‘रेड्डी पॅटर्न’नं बंडखोर नेते सचिन पायलट काँग्रेसला टक्कर देणार?

Rajasthan Political Crisis: शिंदे नव्हे तर ‘रेड्डी पॅटर्न’नं बंडखोर नेते सचिन पायलट काँग्रेसला टक्कर देणार?

Next

जयपूर – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्याविरोधात माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडखोरी केल्यानंतर आता त्यांच्या पुढील भूमिकेबाबत चर्चा होऊ लागली आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी माध्यमांसमोर १०० पेक्षा जास्त आमदारांचं शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे राजकीय संघर्षात पहिला डाव सचिन पायलट यांच्यावर भारी पडला. त्यानंतर सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली.

बुधवारी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत सचिन पायलट यांनी स्पष्ट केले आहे की, ते ज्योतिरादित्य शिंदेप्रमाणे भाजपात जाणार नाहीत, ज्या भाजपाविरोधात संपूर्ण राजकारण केले त्यांच्यासोबत कसं जाणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संपूर्ण प्रकरणावर ज्या पद्धतीने भाजपा नेते सचिन पायलट यांच्याबद्दल सहानुभुती दाखवत आहेत त्यामुळे पायलट भाजपात प्रवेश करतील अशी दाट शक्यता होती. मात्र सचिन पायलट यांच्या या स्पष्टीकरणामुळे पुढे काय हा प्रश्न उभा राहतो.(Rajasthan Political Crisis)

राजकारणात असे प्रश्न निर्माण होतात त्यावेळी इतिहासात मागे वळून पाहावं लागतं. मागील २ दशकातील भारतीय राजकारणाकडे पाहिले तर जगन मोहन रेड्डी यांचेही राजकीय करिअर अशाच रितीने सुरुवात झाली होती. त्यामुळे आता सचिन पायलटच्या भविष्याबद्दल अंदाज लावले जाऊ शकतात.

कोण आहेत जगनमोहन रेड्डी, सचिन पायलट त्यांचा मार्ग स्वीकारणार?

जगनमोहन रेड्डी सध्या आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री आहेत, २००९ सप्टेंबरमध्ये आंध्रचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय एस आर रेड्डी यांचे विमान दुर्घटनेत निधन झाले. त्यावेळी जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेस नेतृत्वासमोर मागणी ठेवली की वडिलांचा वारस म्हणून त्यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळावी, पण काँग्रेसच्या राज्य नेतृत्व आणि हायकमांडने जगनमोहन यांच्याकडे दुर्लक्ष केले. जेव्हा जगनमोहन रेड्डी यांनी हायकमांडविरुद्ध बंड पुकारलं तेव्हा त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. त्यानंतर जवळपास २ वर्ष त्यांनी राज्याच्या विविध भागाचा दौरा केला होता. १२ मार्च २०११ मध्ये वायएसआर काँग्रेसची स्थापना केली. तब्बल १० वर्ष जनतेसोबत राहून त्यांनी संघर्ष केला. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशात बहुमतावर त्यांनी सत्ता मिळवली.(Sachin Pilot)

सचिन पायलट आणि जगनमोहन रेड्डी यांच्यात साम्य काय?

या दोन्ही नेत्यांची तुलना केली तर दोन्ही नेते बंडखोर वृत्तीचे आहेत. जेव्हा जगन यांनी कॉंग्रेसविरूद्ध बंड केले, तेव्हा त्यांच्या संघर्षाची ताकद कोणालाही दिसली नव्हती, परंतु गेल्या १० वर्षात त्यांनी हे सिद्ध केले की संघर्षाचे दुसरे नाव जगन मोहन रेड्डी आहे.(Jaganmohan Reddy)

दुसरीकडे सचिन पायलट गुर्जर हे समाजातून येतात. हा समाज आक्रमकपणासाठी ओळखला जातो. ते पायलटच्या यांच्यातही दिसते. पायलट हे जवळपास साडेतीन वर्षे राजस्थान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. ते सुमारे पाच वर्षे कार्यकर्त्यांसोबत जमिनीवर उभे दिसले. मीडिया व सोशल मीडियामध्ये अशी अनेक छायाचित्रे व बातम्या आहेत ज्यात सचिन पायलट यांनी भाजपच्या वसुधरा राजे सरकार असताना लाठी खाल्ल्याची चर्चा आहे. पायलट यांच्या अलीकडील विधानावरुन हे स्पष्ट झाले आहे की ते भाजपमध्ये जाणार नाहीत किंवा कॉंग्रेसमध्ये राहणार नाहीत. या अर्थाने, पायलटसमोर स्वतंत्र आघाडी तयार करणे हा एकच पर्याय बाकी आहे. कदाचित ते, जगन मोहन रेड्डी यांच्याप्रमाणे पुन्हा संघर्ष सुरू करेल आणि भाजपपासून अंतर ठेवत कॉंग्रेसला टक्कर देतील.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही भाजपात प्रवेश करणार का? सचिन पायलट यांनी स्पष्टपणे सांगितलं की...

काँग्रेसमध्ये बंडखोरी का केली? सचिन पायलट यांनी पहिल्यांदाच केला खुलासा

सावधान! तुमच्या मोबाईलमध्ये ‘जोकर’ने प्रवेश केलाय का? सायबर पोलिसांचं सतर्कतेचं आवाहन

चीनची अनोखी शक्कल; थर्डक्लास विमानं नेपाळला उच्चदरात विकली अन् कोट्यवधीचा चूना लावला

Web Title: Rajasthan Political Crisis: Sachin Pilot Will Defeat Congress Through Jagan Mohan Reddy Formula

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.