...अन्यथा जनतेचा लोकप्रतिनिधींवरील विश्वास संपेल; काँग्रेस आमदाराचं भाजपाच्या ज्येष्ठ नेत्याला पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 01:35 PM2020-07-19T13:35:19+5:302020-07-19T13:37:38+5:30
माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपाचे वरिष्ठ नेते कैलाश मेघवाल यांनी शनिवारी काँग्रेस सरकार आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे समर्थन केले, त्यानंतर काँग्रेसचे कोटा जिल्ह्यातील सांगोद मतदारसंघातील आमदार भरत सिंह यांनी पत्र लिहिलं आहे
कोटा – राजस्थानमध्ये सुरु असलेल्या सत्तासंघर्षात विरोध आणि समर्थनाची रस्सीखेच सुरु आहे. यात माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपा नेते कैलाश मेघवाल यांनी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना यांच्या सरकारचं समर्थन करत सरकार पाडण्याचं षडयंत्रावरुन भाष्य केले आहे. त्याचसोबत घोडेबाजार योग्य नाही सांगत मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे समर्थन केले आहे. यानंतर भाजपात राजकीय वातावरण पेटलं आहे.
माजी विधानसभा अध्यक्ष आणि भाजपाचे वरिष्ठ नेते कैलाश मेघवाल यांनी शनिवारी काँग्रेस सरकार आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे समर्थन केले, त्यानंतर काँग्रेसचे कोटा जिल्ह्यातील सांगोद मतदारसंघातील आमदार भरत सिंह यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात भरत सिंह यांनी कैलास मेघवाल यांचे धन्यवाद मानले आहेत. माहितीनुसार भरत सिंह यांनी कैलास मेघवाल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, तुम्ही विधानसभेचे ज्येष्ठ आमदार आहात. त्याचसोबत विधानसभेचे माजी अध्यक्षही राहिले आहात. भाजपाचे सध्याचे आमदार आहात, तुम्ही भाजपा काँग्रेस सरकार पाडत असल्याबाबत विधान करुन त्याचा निषेध केला. लोकशाहीत राजकीय व्यवस्थेतील या पडत्या व्यवस्थेवर धाडसी विधान केले आहे. आपल्या सगळ्यांना पक्षाच्या धोरणांपलीकडे जाऊन योग्य विचारांवर बोललं पाहिजे, अन्यथा जनतेचा लोकप्रतिनिधींवरील विश्वास संपेल, ते लोकशाहीसाठी घातक आहे असं ते म्हणाले.
काय म्हणाले होते कैलास मेघवाल?
ज्याप्रकारे गेल्या २ महिन्यापासून सरकार कोसळण्याचं वातावरण बनलं आहे, घोडेबाजार होत आहे, आरोप-प्रत्यारोप होत आहेत ते दुर्दैवी आहे. भाजपा कधी अशा लोकांची मदत करणार नाही. स्वातंत्र्यानंतर राजस्थानमध्ये अनेक सरकारे बदलली, विधानसभेच्या सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेकदा वाद-विवाद झाले. पण सत्ताधारी पक्ष विरोधी पक्षाशी मिळून सरकार पाडण्याचं षडयंत्र जे आज होत आहे ते कधीच झालं नाही.
राजस्थानमध्ये काय सुरु आहे?
राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील तणाव वाढल्याने काँग्रेस सरकारवर संकट निर्माण झालं, पक्षविरोधी कारवाया केल्यानं सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं. सचिन पायलट यांनी अशोक गहलोत यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत काँग्रेसमध्ये बंडखोरी केली, त्यानंतर आपल्याला ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला, मात्र मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आमदारांचे शक्तीप्रदर्शन करत त्यांना दावा खोडून काढला. राजस्थानमध्ये काँग्रेसचे १०७ आमदार आहेत, तर इतर काही अपक्षांचा पाठिंबा आहे, काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपा षडयंत्र रचत आहे असा आरोप मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केला होता, तर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी असून भाजपाने आरोप फेटाळले होते. सचिन पायलट यांनी मी कोणत्याही भाजपा नेत्यांच्या संपर्कात नसून मी भाजपात प्रवेश करणार नसल्याचं स्पष्ट केले होते, पण अद्याप सचिन पायलट यांनी पुढची भूमिका जाहीर केली नाही, त्यामुळे अद्यापही राजस्थानमधील सत्तासंघर्षनाट्य सुरुच आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
राजस्थानमधील सत्तासंघर्षाचा मुख्यमंत्री अशोक गहलोत करणार ‘The END’?
रायगडावरील हत्ती तलाव १५० वर्षांनी भरला; छत्रपती संभाजीराजेंनी जलपूजन केलं अन् म्हणाले...
विश्व हिंदू सेनेचं आंदोलन की स्टटंबाजी?; नेपाळी सांगून ज्या युवकाचं मुंडन केलं, तो तर...
नववधू कोरोना पॉझिटिव्ह निघाली; कुटुंबातील ९ जण बाधित तर ८६ जणांना क्वारंटाईन केलं
वैद्यकीय चमत्कार! १३० दिवसांनी महिलेला मिळालं जीवदान; नर्स अन् डॉक्टरांचे मानले आभार