जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी मंगळवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेत सहभाग घेतला. "आज भारतानं मोठा पल्ला गाठला आहे. केवळ आपल्यालाच नाही तर पूर्ण जगाला भारत धान्य पुरवत आहे," असं ते यावेळी म्हणाले. तसंच भगवान श्रीराम हे सर्वांचे आहेत. तसंच अल्लाह आणि देवात फरक केला तर हा देश विभागला जाईल, असंही ते म्हणाले. "प्रभू श्रीराम हे संपूर्ण जगाचे राम आहेत. जर ते संपूर्ण जगाचे राम आहेत तर ते आपल्या सर्वांचे राम आहेत. कुराण फक्त आमचं नाही, सर्वांचं आहे. जर तुम्ही कोणती चूक केली तर आम्ही ती बरोबर करू आणि आम्ही काही चूक केली तर ती तुम्ही बरोबर कराल. असाच देश चालतो," असं फारुख अब्दुल्ला म्हणाले. मला भारतातच जगायचंय आणि मरायचंय"आज तुम्ही आम्हाला पाकिस्तानी म्हणता, खलिस्तानी म्हणता, चिनी म्हणता. मला भारतातच जगायचं आहे आणि भारतातच मरायचंय. मी कोणालाही घाबरत नाही. मला फक्त वरच्याला उत्तर द्यायचंय. आम्ही तुम्हाला कधीच शत्रू मानलं नाही. तुम्हाचा आमचाच भाग मानला. जेव्हा तुम्ही विरोधी पक्षात असाल तेव्हा आम्ही तुमचा सन्मान करू आणि तुमच्यापेक्षाही अधिक करू," असंही त्यांनी नमूद केलं.
फारुख अब्दुल्ला म्हणाले, "श्रीराम सर्वांचेच, देव आणि अल्लाहमध्ये फरक करता येणार नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 8:42 PM
भगवान श्रीराम हे सर्वांचे आहेत. तसंच अल्लाह आणि देवात फरक केला तर हा देश विभागला जाईल, अब्दुल्ला यांचं वक्तव्य
ठळक मुद्देकाश्मीरमध्ये ४ जी सेवा सुरू केल्याबद्दल आनंद केला व्यक्तशेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचं सरकारला केलं आव्हान