शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
5
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
6
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
7
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
8
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
9
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
10
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
11
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
12
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
13
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
14
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
15
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
16
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
17
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
18
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
19
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स

आठवले, खोत, मेटे आणि जानकर ठरले युतीचे पोस्टर बॉईज 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 9:03 AM

राजकारणात ''दिल्या-घेतल्या''शिवाय काही होत नाही असे म्हटले जाते. मतं मिळवण्यासाठी तुम्ही एखाद्या पक्षाला, गटाला किंवा व्यक्तीला जवळ करत असाल तर सत्तेवर आल्यावर त्या व्यक्तीला याची पुरेपूर किंमत द्यावी लागते.

पुणे : राजकारणात ''दिल्या-घेतल्या''शिवाय काही होत नाही असे म्हटले जाते. मतं मिळवण्यासाठी तुम्ही एखाद्या पक्षाला, गटाला किंवा व्यक्तीला जवळ करत असाल तर सत्तेवर आल्यावर त्या व्यक्तीला याची पुरेपूर किंमत द्यावी लागते. आजही लहान पक्षांना सोबत घेतल्यावर मोठे पक्षांनी त्यांना खुश ठेवण्यासाठी काही पदे देण्याची परंपरा खूप जुनी आहे नव्हे त्यांना ती द्यावीच लागते. पण यंदाच्या निवडणुकीत मात्र युतीने ही परंपरा मोडायची ठरवलेली दिसत आहे. शिवसेना-भाजपच्या युतीमध्ये आगामी लोकसभा निवडणूका बघता आरपीआयचे रामदास आठवले, रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे विनायक मेटे आणि रासपचे महादेव जानकर यांना स्वतःला आणि पक्षाला एकही जागा न मिळाल्याने चौघेही युतीचे पोस्टर बॉईज ठरले आहेत. 

या चौघांपैकी आठवले यांच्यामुळे २०१४ साली दलित मतांचे मोठे दान युतीच्या पदरात पडले. सध्या केंद्रात मंत्री असून त्यांचा ईशान्य मुंबईच्या जागेवर डोळा होता. पण राज्याच्या मंत्रिमंडळात आरपीआयला स्थान देणार या आश्वासनाप्रमाणे ही मागणीही बारगळली. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीला मिळणारा प्रतिसाद बघता आठवले यांचे भाजपमधले एकंदर महत्वचं कमी झाले आहे. विनायक  मेटे यांना सध्या शिवस्मारकाचे अध्यक्षपद दिले असून गेले साडेचार वर्षं त्या व्यतिरिक्त त्यांना काहीही मिळाले नव्हते. ऐन निवडणुकीच्या मोक्यावर त्यांच्या काही कार्यकर्त्यांना महामंडळावर घेऊन पदांचे शिंपण करण्यात आले. त्यामुळे दिलेले गोड मानून गप्प बसण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही.शिवाय मराठा आरक्षणाच्यावेळी मेटे यांच्यामुळे सरकारला फार मोठी मदत मिळाली नसल्याने त्यांनाही युतीत अपेक्षित महत्व नाही. सदाभाऊ खोत यांची अवस्था तर अधिक वाईट असून त्यांना बाहेर पडण्यास जागाच शिल्लक नाही. स्वाभिमानी महाआघाडीत सामील झाल्याने त्यांना ती दारे बंद आहेत. दुसरीकडे त्यांच्या रयत स्वाभिमानी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने त्यांची कोंडी झाली आहे. महादेव जानकर यांचीही परिस्थिती वेगळी नसून तेही युतीत मिळेल त्यात जमवून घेण्यास तयार आहे. शनिवारी पुण्यात झालेल्या रासपच्या मेळाव्यात त्यांनी दंड थोपटले खरे, मात्र काहीही करायची तयारी दाखवली तरी त्यांचे हे बंड थंड होण्यासाठीच असल्याचे त्यांनीच सूचित केले आहे.त्यामुळे जानकर कुठेही जाणार नाही हे सगळेच जाणून आहेत. यांच्यापैकी आठवले आणि जानकर यांनी निदान पुढे येत आम्हाला जागा लढवण्यात रस असल्याचे दाखवले होते. उर्वरित दोघे तर मूळ भाजपचे असल्यासारखे निवडणूक लढवण्याच्या इराद्यातही दिसून आले नाहीत. नेत्यांच्या अशा ऐनवेळी कचखाऊ धोरणामुळे कार्यकर्तेही नाराज होतात. मात्र सध्याच्या राजकारणात सर्वांत शेवटचा घटक कार्यकर्ता असल्यामुळे कोणालाही त्याचा फारसा फरक पडलेला दिसून येणार नाही.

असे असले तरी प्रत्यक्षात या चारही नेत्यांना फार काळ गृहीत धरून चालणार नाही याची युतीच्या नेत्यांना कल्पना आहे. विशेषतः महाआघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लहान पक्षांना निदान एक ते दोन जागा सोडल्यामुळे युतीमध्ये उपद्रव वाढणार आहे. त्यामुळे लोकसभेत दुर्लक्ष केले तरी विधानसभेत मात्र त्यांना न्याय द्यावा लागेल. राजकारणात उद्याचं सांगणं कठीण झालेल्या काळात विधानसभेची शास्वती देणे सध्या तरी कठीण आहे. मात्र अशा परिस्थितीतसुद्धा या चारही नेत्यांनी सगळे समजून, उमजून आणि आहे त्यात धन्यता मानत पोस्टर बॉईज म्हणून राहण्याची तयारी दाखवल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेVinayak Meteविनायक मेटेSadabhau Khotसदाभाउ खोत