“महाराष्ट्रात कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही”; केंद्रीय मंत्र्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 07:12 PM2021-08-22T19:12:53+5:302021-08-22T19:16:14+5:30

एका केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्राचे राजकारण असे आहे की, कोणताही पक्ष राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही, असे म्हटले आहे.

ramdas athawale says no party can establish power on its own in maharashtra | “महाराष्ट्रात कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही”; केंद्रीय मंत्र्यांचा दावा

“महाराष्ट्रात कोणताही पक्ष स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही”; केंद्रीय मंत्र्यांचा दावा

googlenewsNext
ठळक मुद्देकोणताही पक्ष राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाहीदोन किंवा तीन पक्षांना एकत्र येऊन युती करावी लागतेकेंद्र सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष वाढला

नाशिक: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलून गेल्याचे पाहायला मिळाले. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात होते. आता मात्र स्वबळाची भाषा राजकीय पक्षांकडून केली जाताना दिसत आहे. यातच आता एका केंद्रीय मंत्र्यांनी महाराष्ट्राचे राजकारण असे आहे की, कोणताही पक्ष राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही, असे म्हटले आहे. (ramdas athawale says no party can establish power on its own in maharashtra)

“आता सामनाचे नाव बदलावे आणि पाकिस्ताननामा किंवा बाबरनामा करावे”; भाजपची टीका

रिपाइंचे सर्वेसर्वा आणि केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी राज्यातील सत्ताकारणाबाबत आपली मते मांडली. ते नाशिकमध्ये बोलत होते. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उत्कर्षासाठी काम केले. मात्र त्यांनी देश घडविण्याचेही काम केले आहे. नदीजोड प्रकल्प त्यांनी देशाला सुचवला. दामोदर व्हॅलीची निर्मिती केली. विविध जाती धर्माच्या, विविध भाषेच्या, गरीब श्रीमंत सर्व वर्गाच्या माणसांना एकत्र जोडणारा समतेचा मार्ग, राष्ट्रीय एकात्मतेचा मार्ग डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, असे रामदास आठवले यांनी सांगितले.

वंदे भारत! अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज; आपातकालीन परिस्थितीत मिळतील ‘या’ विशेष सुविधा

मोठे पक्ष राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही

महाराष्ट्राचे राजकारण असे आहे की, कोणताही पक्ष राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप हे चारही मोठे पक्ष राज्यात स्वबळावर सत्ता स्थापन करू शकत नाही आणि त्यांचे लोकप्रतिनिधीही निवडून आणू शकत नाही. त्यासाठी दोन किंवा तीन पक्षांना एकत्र येऊन युती करावी लागते, असे सांगत म्हणूनच रिपाइं युतीचे राजकारण करीत असल्याचे रामदास आठवले यांनी नमूद केले.

“शेजारी राष्ट्रामधील अस्थिरता CAA ची गरज अधोरेखित करते”; केंद्रीय मंत्र्यांचे स्पष्ट मत 

दरम्यान, सन १९९८ मध्ये काँग्रेससोबत युती केल्यामुळे रिपाइंचे ४ खासदार लोकसभेत निवडून आले होते. कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच राजकीय निर्णय घेत असतो, असे नमूद करत केंद्र सरकारमध्ये सहभागी झाल्यापासून संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष वाढला आहे. काश्मीर ते कन्याकुमारी, आसामपासून गुजरातपर्यंत संपूर्ण देशात रिपब्लिकन पक्ष वाढला आहे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
 

Web Title: ramdas athawale says no party can establish power on its own in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.