मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढणार असून, विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरेल, असा दावा नाना पटोले यांनी अलीकडेच केला होता. त्यावरून आता काँग्रेसवर टीका करण्यात येत असून, काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरावा, अन्यथा पाठिंबा काढून घ्यावा, असा सल्ला केंद्रीयमंत्र्यांनी काँग्रेसला दिला आहे. (ramdas athawale suggest nana patole that congress should insist for Chief Minister post)
फक्त इच्छा व्यक्त करून चालणार नाही, तर काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला पाहिजे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे काँग्रेस च्या पाठिंब्यावर तरलेले सरकार आहे. काँग्रेसने पाठिंबा काढला तर महाविकास आघाडी सरकार पडेल. त्यामुळे काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला पाहिजे. जर काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिले जात नसेल, तर काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढावा, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना केले आहे.
मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला पाहिजे
नाना पटोले यांनी नुकतेच राज्यात विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल तसेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनण्यास नाना पटोले यांची तयारी असल्याची इच्छा नाना पटोले यांनी स्वतः व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसने महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला पाहिजे आणि मुख्यमंत्री पद मिळविले पाहिजे. जर मुख्यमंत्री पद देण्यास महाविकास आघाडी सरकार तयार नसेल, तर महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काँग्रेस काढला पाहिजे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
तेलंगणचे माजी आरोग्यमंत्री ई. राजेंद्र यांचा भाजपमध्ये प्रवेश; मुख्यमंत्र्यांशी होता वाद!
नाना पटोलेंना मुख्यमंत्री, राहुल गांधींना वाटतंय
नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हावसं वाटतंय… राहुलजींनाही वाटतंय पंतप्रधान व्हावसं… जनतेला असं अजिबातच वाटत नाही. भविष्यात वाटण्याची शक्यताही नाही हाच दोघांचा प्रॉब्लेम आहे, या शब्दांत अतुल भातखळकर यांनी ट्विटरवरून चिमटा काढला.
६ वर्षीय नातवासमोर तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केला सामूहिक बलात्कार; महिलेची सुप्रीम कोर्टात धाव
दरम्यान, यापूर्वी आणखी एक ट्विट करत अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. सत्तेवर आल्यावर काँग्रेस कलम ३७० पुन्हा लागू करेल असा दावा वरीष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यावर उरलेला काश्मीर पाकिस्तानला आणि लडाख चीनला देऊ शकतो, हे देशाच्या जनतेला पुरते कळून चुकले आहे म्हणून उगाच सत्तेवर येण्याची स्वप्न पाहू नका…, या शब्दांत भातखळकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता.