मुंबई: राज्याच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळूनही त्यांना विरोधकांच्या बाकावर बसायला लागले. त्यानंतर पुन्हा एका आक्रमक होत भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर अनेकविध विषयांवर हल्लाबोल सुरू केला. ठाकरे सरकार पडेल, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, आता पुन्हा शिवसेनेशी झालेला काडीमोड आणि त्यानंतरच्या राजकारणावरून केंद्रीय मंत्र्यांनी पुन्हा एकदा भाष्य केले असून, फडणवीसांनी तेव्हा माझं ऐकलं असतं, तर आज मुख्यमंत्री असते, असे म्हटले आहे. (ramdas athawale taunt devendra fadnavis over chief minister post)
‘सन्मान देवदूतांचा’ या कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजप युती आणि देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पद यांवर मिश्किल भाष्य केले. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. देवेंद्र फडणवीस यांच्याही चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले, असे सांगितले जात आहे. या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री राजेश टोपे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थिती होते.
“अशी दडपशाही करून आघाडी सरकारचं आरक्षण अपयश लोकं कसं विसरतील?”
देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री असते
मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपची ताटातूट झाली आणि पुढे जाऊन सेनेने भाजपशी काडीमोड घेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आपला नवा संसार थाटला. सत्तासंघर्षाच्या याच काळात देवेंद्र फडणवीस यांना शिवसेनेला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा सल्ला दिला होता. माझं जर ते म्हणणे फडणवीसांनी ऐकले असतं तर ते आज मुख्यमंत्री असते, असे सांगत, तुमच्या दोघांच्यात एकमत होत नसेल तर मला मुख्यमंत्री करा, असेही त्यावेळी सांगितले होते, असे रामदास आठवले म्हणाले.
“MPSC ला स्वायत्तता दिली, म्हणजे स्वैराचार नाही”; फडणवीसांची ठाकरे सरकारवर टीका
दरम्यान, कोरोना संकटाच्या कालावधीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तम काम केले. घरच्या कुटुंबाप्रमाणे राज्यातील जनतेची काळजी घेतली. विरोधक भाजपनेही टोपे यांच्यावर कधी टीका केली नाही, असे सांगत आठवले यांनी राजेश टोपे यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले.