रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 03:46 PM2024-10-07T15:46:48+5:302024-10-07T15:49:37+5:30

Ramraje Nimbalkar Sharad Pawar: रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार, हे जवळपास निश्चित झाले. शरद पवारांनी याबद्दल एक मोठं विधान केलं आहे. 

Ramraje Nimbalkar's ncp joining date decided? Sharad Pawar's big statement in Indapur | रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान

रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान

Ramraje Naik Nimbalkar Latest News: लोकसभा निवडणुकीपासूनच अजित पवारांचीराष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीत नाराज असलेल्या रामराजे नाईक निंबाळकर शरद पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार, हे निश्चित मानलं जात आहे. सोमवारी (७ ऑक्टोबर) इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी रामराजे नाईक निंबाळकरांचं नाव न घेता फलटणमध्येही पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे, असे सांगितले आणि तारीखही जाहीर केली. 

शरद पवार इंदापुरात काय बोलले?

शरद पवार म्हणाले, "चित्र बदलतंय. आज हाच कार्यक्रम झाला. निघायच्या वेळेला आणखी कुठून तरी फोन आला. त्यांनी हट्ट केला. इंदापुरला चाललाय, १४ तारखेला आमच्याकडे आलेच पाहिजे. काय कार्यक्रम आहे? म्हणाले, इंदापुरला आहे, तोच आमच्याकडे. म्हटलं कुठे? ते म्हणाले फलटणला", असं शरद पवारांनी सांगितले त्यानंतर हसतच त्यांनी उपस्थितांना प्रश्न केला की, "समजलं का?"

पुढे बोलताना पवार म्हणाले, "आता याच्यानंतर फलटण. फलटण झाल्यानंतर जवळपास सगळ्या महिन्याचे दिवस बुक झाले आहेत. मोठ्या प्रमाणात लोकांच्या मनात निर्णय आहे की, एकत्र आलं पाहिजे. परिवर्तन झालं पाहिजं. महाराष्ट्रातील चित्र वेगळं आहे, संपूर्ण हिंदुस्थानला दाखवलं पाहिजे. ती दाखवण्याची संधी आज महाराष्ट्रात आलेली आहे", असे शरद पवारांनी उपस्थितांना सांगितलं.   

रामराजे नाईक निंबाळकर महायुतीत नाराज?

लोकसभा निवडणुकीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोध केला होता. ते पराभूत झाले आम्ही जबाबदार राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानंतर रणजितसिंह नाईक निंबाळकर पराभूत झाले.

आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रामराजे नाईक निंबाळकर सातत्याने शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल कार्यकर्त्यांशी बोलत आहेत. दोन दिवसांपूर्वी फलटणमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी घ्यायची का? असा सवाल समर्थकांना केला. त्यांनी होकार दिला. त्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला बळ मिळाले आहेत. आता शरद पवारांनीही फलटणमध्ये पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आहे, असे सांगून त्याला हवा दिली आहे. 

Web Title: Ramraje Nimbalkar's ncp joining date decided? Sharad Pawar's big statement in Indapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.