शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

रामटेकमध्ये भगवा की कडेलोट?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 4:22 AM

युतीमुळे शिवसेनेने निश्वास सोडला। काँग्रेसकडून वासनिक पुन्हा मैदानात

- जितेंद्र ढवळेएकेकाळी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी दोेन वेळा प्रतिनिधित्व केलेला रामटेक लोकसभा मतदार संघावर सध्या शिवसेनेचा ताबा आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकुल वासनिक यांनी २००९ मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचला होता. मात्र २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी रामटेकचा गड सर केला. वासनिक यांना तब्बल १,७५,७९१ मतांनी पराभूत करीत रामटेकच्या गडावर पुन्हा एकदा भगवा फडकला. यावेळी रामटेकचा गड सर करण्यात कुणाला यश येते व कुणाचा कडेलोट होतो, याकडे वैदर्भीय जनतेचे लक्ष लध लागले आहे.१९७७ ते २०१४ या ३७ वर्षातील १२ निवडणुकांवर नजर टाकली तर आठ वेळा काँग्रेस पक्षाच्या आणि चार वेळा शिवसेनेच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आहे. या मतदारसंघात भाजपाचे प्राबल्य असल्याचा दाखला देत ही जागा ‘मोठा भाऊ’ म्हणून भाजपाला द्यावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी करून सेनेला काही दिवसापूर्वी घाम फोडला होता. युती झाल्यामुळे शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.जिल्हा परिषदेत युतीची सत्ता आहे. जिल्ह्यातील नगर परिषद, नगर पंचायत आणि पंचायत समितीवर भाजपचे वर्चस्व आहे. आजवर भाजपाच्या खांद्यावर शिवसेना निवडणूक लढत आली आहे. यावेळीही भाजपने युती धर्म पाळल्यास सेनेला लोकसभेत ताकद मिळेल. दुसरीकडे या मतदारसंघात मोडणाऱ्या विधासभेच्या सहापैकी पाच जागेवर भाजप आणि एका जागेवर काँग्रेसचा आमदार आहे. गत वर्षी काटोल विधानसभेत भाजपाकडून जिंकलेले आशीष देशमुख यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसचा ‘हात’ धरला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या काटोलचा कौल लोकसभेत कुणाला जातो याकडे लक्ष लागले आहे.गत पाच वर्षात स्थानिक निवडणुकांमध्येही काँग्रेसचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला नाही. दिल्लीत ‘हेवीवेट’ मानले जाणारे मुकुल वासनिक पुन्हा एकदा काँग्रेसकडून येथे दंड थोपटणार आहेत. अ.भा. काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष नितीन राऊत यांनी रामटेकसाठी जिल्हा काँग्रेसकडे अर्ज सादर करून उमेदवारीवर दावा केला होता.यामुळे काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आल्याचे चित्र समोर आले होते. मात्र वासनिक यांचे नाव पक्के झाल्याने हा वाद शमला आहे. जिल्हाध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी यावेळी रामटेक विधानसभेतून लढण्याची तयारी चालविली असल्यामुळे पक्षाला आघाडी मिळवून देण्यात त्यांची व विधानसभेच्या इतर इच्छुक उमेदवारांचीही खºया अर्थाने परीक्षा होणार आहे. आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने काँग्रेसच्या सोबत राहील असे दिसते. कारण या मतदार संघात मोडणाºया काटोल विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणूक होत आहे. २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून जनसंपर्काचे भांडवल तर काँग्रेसकडून विकास खेचण्यासाठी दिल्लीतील वजन या मुद्यांवर प्रचारयुद्ध रंगताना दिसेल.सध्याची परिस्थितीपुढे विधानसभेच्या निवडणुकीची लढाई असल्यामुळे युती व आघाडी धर्म दोन्ही बाजुने तेवढ्याच ताकदीने पाळला जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे लोकसभेत सेना विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होईल. गेल्यावेळी बसपाच्या किरण पाटणकर यांनी ९५, ०५१ मते घेतली होती. बसपाचा यावेळचा उमेदवार कोण असेल याबाबतही उत्सुकता आहे. बसपाच्या उमेदवार दमदार असल्यास याचा सर्वाधिक फटका कॉँग्रेसला बसेल.सध्या मात्र तसे चित्र नाही.‘आप’च्या अंजली दमानियाने गेल्यावेळी विदर्भात राजकीय माहोल तापविला होता. रामटेकमध्येही ‘आप’चे प्रताप गोस्वामीने २५ हजारावर मते घेतली होती. मात्र यानंतर ‘आप’ने या मतदारसंघात फारसा प्रताप दाखविला नाही.मागील निवडणुकीत या मतदार संघात मतदार संख्या १७ लाख ३१ हजार ४६२ होती. यावेळी १ लाख ६६ हजार १३८ मतदारांची भर पडली आहे. दीड लाखावरील हे नवे मतदार नेमकी काय भूमिका घेतात, यावरही मतदारसंघाचा राजरंग ठरणार आहे.रामटेक लोकसभा मतदारएकूण मतदार- 18,97,600पुरुष- ०9,85,539महिला- 09,12,061२०१४ मध्ये मिळालेली मतेकृपाल तुमाने (शिवसेना)- 5,19,892मुकुल वासनिक (काँग्रेस)- 3,44,101किरण पाटणकर (बसपा)- 95,051प्रताप गोस्वामी (आम आदमी पार्टी)- 25,889गौतम वासनिक (अपक्ष )- 6,353

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKrupal Tumaneकृपाल तुमानेShiv Senaशिवसेना