शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

पोटनिवडणुकातील रणरागिणी

By admin | Published: April 17, 2015 12:00 AM

माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहाकाळ जागेवर राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी तब्बल १ लाख १२ हजार ९६३ इतक्या प्रचंड मताधिक्याने विजय नोंदविला.संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा १९ हजार ...

माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांच्या निधनाने रिक्त झालेल्या तासगाव-कवठेमहाकाळ जागेवर राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी तब्बल १ लाख १२ हजार ९६३ इतक्या प्रचंड मताधिक्याने विजय नोंदविला.

संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा १९ हजार मतांनी पराभव केला. शिवसेनेचे नेते बाळा सावंत यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती.

भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बीड लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपानं मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे यांना रिंगणात उतरवले. प्रीतम मुंडे यांनी ऐतिहासिक विजयाची नोंद करीत काँग्रेसच्या अशोक पाटील यांचा तब्बल ६ लाख ९६ हजार ३२१ मतांनी पराभव केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी सभापती बाबासाहेब कुपेकर यांच्या निधानाने रिक्त झालेल्या जागेवर चंदगड मतदारसंघातून राष्ट्रवादीने कुपेकर यांच्या पत्नी संध्यादेवी कुपेकर यांना तिकीट दिले. संध्यादेवी कुपेकर यांनी शिवसेनेच्या सुनील शिंगे यांचा २४ हजार ८४८ मतांनी पराभव करीत विजय मिळविला.

मनसेचे आमदार रमेश वांजळे यांच्या निधनानंतर मनसेऐवजी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणूक लढविणा-या रमेश वांजळे यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांचा भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार भीमराव तपकीर यांनी त्यांचा ३ हजार ६२५ मतांनी पराभव केला. मनसेने उमेदवार दिला नाही.