UP Election: ‘महाराष्ट्र मॉडेल’वर उत्तर प्रदेशची निवडणूक लढवण्यास सज्ज; काय आहे काँग्रेसचा मास्टरप्लॅन?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 02:10 PM2021-09-12T14:10:40+5:302021-09-12T14:11:54+5:30

यूपीच्या आगामी निवडणुकीत प्रियंका गांधी यांचा चेहरा असेल. त्यामुळे काँग्रेसच्या प्रियंका गांधी या सर्व व्यूहरचना बनवत आहेत.

Ready to contest Uttar Pradesh elections on 'Maharashtra Model'; What is master plan of Congress? | UP Election: ‘महाराष्ट्र मॉडेल’वर उत्तर प्रदेशची निवडणूक लढवण्यास सज्ज; काय आहे काँग्रेसचा मास्टरप्लॅन?

UP Election: ‘महाराष्ट्र मॉडेल’वर उत्तर प्रदेशची निवडणूक लढवण्यास सज्ज; काय आहे काँग्रेसचा मास्टरप्लॅन?

Next
ठळक मुद्देउत्तर प्रदेशात एकूण ४०३ जागा असल्या तरी पक्ष केवळ १०० जागांवर विजय मिळेल यासाठी प्रयत्नशील आहे.२०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसनं ७ जागांवर विजय मिळवला. परंतु यावेळी जास्त जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेस ताकद लावत आहेशनिवारी प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. पुढील वर्षी २०२२ मध्ये यूपीत निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसही रणनीती आखत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी ३० वर्षांनी संघटनेचे फेरबदल करण्याची शक्यता आहे. त्यासाठी गांधी कुटुंब महाराष्ट्र मॉडेलवर काम करत आहे.

काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसनं प्रदेशाध्यक्षाची निवड केली. पण त्याचसोबत ६ कार्यकारी अध्यक्ष बनवले होते. आता उत्तर प्रदेशातही काँग्रेस हीच रणनीती आखत आहे. काँग्रेसचे काही जण प्रदेशाध्यक्ष अजय सिंह लल्लू यांच्यावर नाराज आहेत. अशा स्थितीत प्रियंका गांधी पक्षात गटबाजी नको यासाठी प्रयत्न करत आहेत. पक्ष नाराज असलेल्या नेत्यांना आणि जातीय समीकरण साधण्याचा विचार करत आहे. उत्तर प्रदेशात एकूण ४०३ जागा असल्या तरी पक्ष केवळ १०० जागांवर विजय मिळेल यासाठी प्रयत्नशील आहे. जेणेकरुन इतर पक्षांसोबत काँग्रेसची युती होऊ शकेल. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसनं ७ जागांवर विजय मिळवला. परंतु यावेळी जास्त जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेस ताकद लावत आहे.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहंवर दुहेरी संकट; भाजपाची सत्ता राखण्याचं मोठं आव्हान

यूपीच्या आगामी निवडणुकीत प्रियंका गांधी यांचा चेहरा असेल. त्यामुळे काँग्रेसच्या प्रियंका गांधी या सर्व व्यूहरचना बनवत आहेत. १०० जागांवर निवडून येतील असे उमेदवार काँग्रेस शोधत आहेत. कारण १०० पैकी ८० जागांवर काँग्रेसला विजय मिळाला तरी त्यांच्या विना सरकार बनवणं कठीण होईल. शनिवारी प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. उमेदवारी तिकीटासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्जासाठी ११ सप्टेंबर ते २५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

शिवसेना १०० जागा लढवणार

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत कालपर्यंत शिवसेना सर्व ४०३ जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. परंतु २४ तासांत पुन्हा ४०३ वरुन खाली येत १०० जागा लढवण्याची घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेनेनच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ४०३ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर संजय राऊत यांनी केवळ १०० जागा लढवणार असल्याचं स्पष्ट केले.

उत्तर प्रदेशात शिवसेनेचा यू-टर्न; अवघ्या २४ तासांत ४०३ वरुन १०० जागांवर घसरण

उत्तर प्रदेश निवडणुकीच्या( Uttar Pradesh Assembly Election) पार्श्वभूमीवर शिवसेनेने कितीही मोठी घोषणा केली तरी ग्राऊंड लेव्हलवर परिस्थिती वेगळी आहे. २०१७ च्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत आकडेवारी पाहिली तर शिवसेनेला राज्यात जनाधार नसल्याचं दिसून आलं आहे. २०१७ मध्ये शिवसेनेने उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत ५७ जागा लढवल्या होत्या. त्यातील ५६ जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं होतं. केवळ एका जागेवर डिपॉझिट वाचवण्याची नामुष्की शिवसेनेवर(Shivsena) आली होती.

Web Title: Ready to contest Uttar Pradesh elections on 'Maharashtra Model'; What is master plan of Congress?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.