शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
2
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
3
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
4
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
5
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
6
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
7
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
8
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती
9
"145 उमेदवार उभे केले म्हणजे..."; रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना खोचक टोला
10
"ते खटा-खट म्हणत राहिले, आम्ही महिलांच्या खात्यात पटापट पैसे टाकले"; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांना टोला
11
बंद पडलेल्या जेट एअरवेजची मालमत्ता विकण्याचे आदेश; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
12
"मी राजकारणात आलेलं चाहत्यांना आवडलेलं नाही, पण...", राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर सयाजी शिंदे पहिल्यांदाच बोलले
13
सदाभाऊंची जीभ पुन्हा घसरली; संजय राऊतांना म्हणाले, "कितीही साबण, शाम्पू लावला तरी..."
14
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
15
इगतपुरी - त्र्यंबकेश्वर मतदारसंघ : चौरंगी लढतीत कोण निवडून येणार राव?
16
सरकारी भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत,सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
17
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
18
नवरा बायकोचं भांडण, एका 'OK' नं रेल्वेला ३ कोटींचा फटका; कोर्टातील अजब प्रकरण काय?
19
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
20
Shah Rukh Khan :"जीव वाचवायचा असेल तर कोट्यवधी रुपये द्या, अन्यथा..."; सलमाननंतर शाहरुख खानला धमकी

Vidhan Sabha Adhiveshan: 31 जुलैपर्यंत MPSC मधील सदस्यांची भरती, नोकर भरती नाही; घोषणेची फडणवीसांकडून 'पोलखोल'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2021 2:06 PM

Vidhan Sabha Adhiveshan: देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा मुद्दा उपस्थित करत अधिवेशनाच्या कामकाजात इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून आधी एमपीएससीवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. यावेळी एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर याची सुसाईड नोट सभागृहात वाचून दाखवली. यानंतर अजित पवारांनी ही घोषणा केली होती.

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan: राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस वादग्रस्त ठरला आहे. अध्यक्षांच्या दालनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला आहे. याचबरोबर स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवरूनही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. यावर अजित पवार (Ajit pawar) यांनी ३१ जुलै पर्यंत एमपीएससीमधील रिक्त जागा (MPSC recruitment announcement) भरण्याची घोषणा केली होती. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही फसवी घोषणा असल्याचा आरोप केला आहे. (Devendra Fadanvis told about what exact Ajit pawar told about MPSC recruitment till 31 july, 2021.)

Vidhan Sabha Adhiveshan: स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्या; सुधीर मुनगंटीवार यांची सभागृहात मागणी

देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात एमपीएससी परीक्षेचा मुद्दा उपस्थित करत अधिवेशनाच्या कामकाजात इतर सर्व प्रश्न बाजूला ठेवून आधी एमपीएससीवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली. यावेळी एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या स्वप्निल लोणकर याची सुसाईड नोट सभागृहात वाचून दाखवली. राज्य सरकार MPSC बाबत गंभीर नाही. राज्यातील लाखो मुलं परीक्षा, मुलाखती, नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. अशावेळी सरकार आणि आयोग नेमकं काय करतंय? असा सवाल फडणवीसांनी यावेळी केला. देवेंद्र फडणवीसांच्या या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३१ जुलै २०२१ प्रयंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा अधिवेशनात केली. 

Vidhan Sabha Adhiveshan: स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत द्या; सुधीर मुनगंटीवार यांची सभागृहात मागणी

मात्र, ओबीसी आरक्षणावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते. यावेळी फडणवीसांनी विधानसभेच्या बाहेर येत अजित पवारांनी केलेल्या घोषणेवर गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांनी जी ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीतील रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा केली आहे ती म्हणजे परिक्षा दिलेल्या उमेदवारांची भरती नव्हे, तर संस्थेत रिक्त असलेली पदे भरण्याची असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. एमपीएससी संस्थेमध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी मुदत कशाला लागते, ती कधीही भरता येतात, असा आरोप करत ही फसवी घोषणा असल्याचे फडणवीस म्हणाले.

Vidhan Sabha Adhiveshan: ३१ जुलै २०२१ पर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार; अजित पवारांची मोठी घोषणा

तसेच ओबीसींच्या इम्पेरिकल डेटावर देखील त्यांनी आक्षेप घेतले. हा पॉलिटिकल इम्पेरिकल डेटा राज्याने तयार करायचा असतो, केंद्राने नाही. मग केंद्राकडून मागण्यासाठी प्रस्ताव मंजूर करण्याची दिशाभूल कशासाठी असे देखील फडणवीस यांनी विचारले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारMPSC examएमपीएससी परीक्षा