शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

Video: “४८ तास उलटले, कुठे आहे ‘त्या’ १६ कंपन्यांची यादी? खोटं बोलून स्टंटबाजी करणं थांबवा”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 12:39 PM

BJP Kirit Somaiya Slams Nawab Malik: लोकांना ऑक्सिजन, बेड्स मिळत नाहीत काहीतरी काम करा असा टोला सोमय्यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ नका असा आदेश केंद्र सरकारने दिल्याचा आरोप ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी केला होताआरोप सिद्ध करा अन्यथा माफी मागा असं खुलं चॅलेंज भाजपानं मलिकांना दिलं होतं. ४८ तास झाले कुठे आहे त्या १६ कंपन्यांची यादी? - किरीट सोमय्यांचा प्रश्न

मुंबई – राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन पुरवाल तर कंपन्यांचा परवाना रद्द करू अशी धमकी केंद्र सरकारने १६ कंपन्यांना दिल्याचा दावा मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. मात्र त्या १६ कंपन्या कोणत्या याबाबत खुलासा करावा असं चॅलेंज भाजपानंनवाब मलिकांना दिलं होतं.(BJP Kirit Somaiya Target NCP Nawab Malik over allegations of Remdesivir Injection Stock)   

त्यानंतर आता भाजपा नेते किरीट सोमय्यांनी नवाब मलिकांवर टीका करताना म्हटलंय की, महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शन देऊ नका असा आदेश केंद्र सरकारने दिल्याचा आरोप ठाकरे सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. ४८ तास झाले कुठे आहे त्या १६ कंपन्यांची यादी? मोदी सरकारनं प्रतिबंध केलेले पत्र? खोटं बोलणं थांबवा आणि स्टंटबाजी थांबवा. लोकांना ऑक्सिजन, बेड्स मिळत नाहीत काहीतरी काम करा असा टोला त्यांनी लगावला आहे.

नवाब मलिकांनी काय आरोप केला?

केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरच्या कुपी विकायला परवानगी मिळत नाहीय. केंद्रसरकार त्यास नकार दिला आहे. भारतात १६ निर्यातदार आहेत ज्यांच्याकडे रेमडेसिवीरच्या २० लाख कुपी आहेत. हे उत्पादन करणार्‍या ७ कंपन्यांमार्फतच रेमडेसिवीर विकले जावे असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. मात्र या ७ कंपन्या जबाबदारी घेण्यास नकार देत असल्याने आता केंद्र सरकार पुढे निर्णय घेण्याचा पेच निर्माण झाला आहे. रेमडेसिवीर या औषधाची आवश्यकता असताना आणि उपलब्धता देखील असताना तात्काळ निर्णय घेणे ही काळाची गरज आहे. या समस्येचे निराकरण करणे आवश्यक आहे आणि राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयात ताबडतोब रेमडेसिवीरच्या कुपी पुरवल्या जाव्यात अशी मागणी नवाब मलिक यांनी केली होती.

दरम्यान राज्यसरकारने १६ निर्यात कंपन्यांकडे रेमडेसिवीरबाबत विचारणा केली असता केंद्र सरकारने महाराष्ट्रात रेमडेसिवीर औषध पुरवठा करण्यास बंदी घातली आहे. जर आम्ही हे रेमडेसिवीर दिल्यास परवाना रद्द करण्याची धमकी दिली आहे असे सांगितले आहे. हे खेदजनक आणि धक्कादायक असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलं. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता रेमडेसिवीरची कमतरता भासू लागली असतानाच ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या परिस्थितीत महाराष्ट्र सरकारकडे या १६ निर्यातदारांकडून रेमडेसिवीरचा साठा ताब्यात घेऊन गरजूंना पुरवण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला होता.

 

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याBJPभाजपाnawab malikनवाब मलिकcorona virusकोरोना वायरस बातम्या