शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

“उठले की निघाले आरोप करायला, म्हणे फडणवीसांना अटक करा; अटक मटक चवळी चटक वाटलं की काय?”

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 2:57 PM

BJP Chitra Wagh Target NCP Rupali Chakankar: एकाबाजूला राजकारण करू नका हे विरोधी पक्षाला सांगायचं व दुसरीकडे आपलं अपयश लपवण्यासाठी कांगावा करायचा असा टोला भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

ठळक मुद्देरेमडेसिवीर राज्य सरकारलाचं देणार होते संबंधीत मंत्र्यांशी CSसाहेबांशी बोलणं झालेलं..माहिती तर घ्यायचीआधी सरकार म्हणतं सहकार्य करा आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रेभाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांना फटकारलं

मुंबई – राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. पार्ले पोलीस स्टेशनला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाऊन पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर यांनी करत फडणवीसांना अटक करा अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली. त्यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांची खिल्ली उडवली आहे.(BJP Chitra Wagh Reaction on NCP Rupali Chakankar Statement on Devendra Fadnavis)

भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विट करून म्हटलंय की, उठले की निघाले आरोप करायला, आता काय तर म्हणे देवेंद्र फडणवीसांना अटक करा. अटक मटक चवळी चटक वाटलं की काय? रेमडेसिवीर राज्य सरकारलाचं देणार होते संबंधीत मंत्र्यांशी CSसाहेबांशी बोलणं झालेलं..माहिती तर घ्यायची. आधी सरकार म्हणतं सहकार्य करा आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे अशा शब्दात अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.

तसेच एकाबाजूला राजकारण करू नका हे विरोधी पक्षाला सांगायचं व दुसरीकडे आपलं अपयश लपवण्यासाठी कांगावा करायचा. रोज माणसं तडफडून मरताहेत. रेमडेसिवीर अभावी देवेंद्र फडणवीस यांनी ब्रूक फार्मा कंपनीला विनंती करत नियमाने FDA ची परवानगी घेत आणण्याचा प्रयत्न केला तर कंपनीच्या माणसांनाच पोलीस उचलतात. ब्रूक फार्मा रेमडेसिवीरची मदत महाराष्ट्राला करणार होते. त्या कंपनीच्या लोकांना मंत्र्याचा OSD फोनकरून दम देतो? मंत्र्याच्या OSD ची काय एवढी हिंमत की तो कंपनीच्या लोकांना फोनवरून धमकी देईल की सरकारला यातूनही आधी वसूली करायची होती याबाबत चकार शब्द ही सत्ताधाऱ्यांकडून आला नाही असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

शिवसेना-भाजपात वाद पेटला; माजी आमदार विजयराज शिंदेंना मारहाण, बुलडाण्यात तणाव

काय म्हणाल्या होत्या रुपाली चाकणकर?

रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शनचा साठा असल्याच्या संशयावरून पोलिसांनी ब्रूक फार्माच्या मालकाला चौकशीसाठी बोलावलं होतं. परंतु त्यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्टेशनवर जाऊन सरकारी कामात अडथळा आणला त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले होते.  

 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसChitra Waghचित्रा वाघBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस