नवी दिल्ली: रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं वृत्त काही इंग्रजी माध्यमांनी दिलं होतं. मात्र अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही. आंबेडकर यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या शीला दीक्षित यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं वृत्त इंग्रजी प्रसारमाध्यमांकडून देण्यात आलं होतं. यावर भाष्य करताना दिल्ली प्रदेश रिपब्लिकन सेना बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आंबेडकर यांनी ट्विट करून दिली.
आनंदराज आंबेडकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 11:33 IST