शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

''जमिनी घेऊन भलतेच उद्योगपती होणार म्हणून प्रकल्पांना विरोध''

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 11:59 PM

शेतकऱ्यांना मात्र वा-यावर सोडणार म्हणूनच प्रकल्पांना विरोध केला, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथे बुधवारी केले.

माणगाव : प्रकल्पांसाठी माझ्या कोकणवासीयांच्या जमिनी घेऊन काही जण कारखानदार होणार आणि शेतकऱ्यांना मात्र वा-यावर सोडणार म्हणूनच प्रकल्पांना विरोध केला, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माणगाव येथे बुधवारी केले. रायगड लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. ठाकरे यांनी प्रचारसभेमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर जोरदार टीका केली.ठाकरे यांनी सुनील तटकरे यांना त्यांच्याकडील संपत्तीवरून लक्ष्य केले. गीतेसाहेब तुमच्यात आणि तटकरे यांमध्ये खूप फरक आहे. त्यांनी किती प्रॉपर्टी जमवलेली आहे. गीतेसाहेब तुम्हाला ते इतके वेळेस खासदार करूनही जमले नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आमचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे ठरलेले आहेत; पण काँग्रेसमध्ये त्यांचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.उद्धव ठाकरे म्हणाले, अंतुले यांनी कुलाबा जिल्ह्याचे रायगड असे नाव केले, असे आमचे जुने नाते आहे. पाकिस्तान आमचा दुश्मन आहे तसा तुमचा दुश्मन आहे. जर उद्या युद्ध झाले पाकिस्तानने टाकलेला बॉम्ब घर पाहून पडणार नाही, धर्म बघून पडणार नाही. म्हणून सर्व मुसलमान बांधवांना माझे आवाहन आहे की, देशासाठी एकत्र या. आमचे भाजपसोबत मतभेद होते ते वैयक्तिक नसून ते जनतेसाठी होते आणि आताही युतीसुद्धा जनतेसाठीच केलेली आहे. युतीही देव, देश आणि धर्मासाठी केल्याचे त्यांनी सांगितले.उद्योगमंत्री सुभाष देसाई या वेळी बोलताना म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रकल्प कोकणच्या पर्यावरणाला हानिकारक होता म्हणून हद्दपार केला. १०० हून अधिक कंपन्या तटकरे यांच्या आहेत. ८०० एकर जमीन आपल्या नावाने आहे. धीरूभाई अंबानी यांच्या ३२ आणि तुमच्या १०० ही प्रगती नैसर्गिक आहे का? असा सवाल त्यांनी केला.

युतीचे उमेदवार अनंत गीते म्हणाले, जनतेने मला सहा वेळा खासदार बनवले. त्या जनता जनार्दनाला मी देव मानतो. मी सुरेश प्रभू यांना धन्यवाद देतो, त्यांनी कोकण रेल्वे ही एकपदरी रेल्वे दोनपदरी करण्याच्या कामात मोलाची मदत केली. नितीन गडकरी यांना विनंती केली, त्यांनी मुंबई ते गोवा महामार्ग चौपदरीकरण करण्यासाठी मोलाची मदत केली. माझा संपूर्ण मतदारसंघाचा दौरा झाला आहे. माझे मतदार माझ्यासोबत आहेत, मी उद्धवसाहेबांना वचन देतो की इथून जास्तीत जास्त मतांनी मी निवडून येईन, असे त्यांनी नमूद केले.
रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, एकही भ्रष्टाचाराचा आरोप नसलेला नेता म्हणजे अनंत गीते आहेत. ही निवडणूक देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली की, शेतकºयाची कर्जमाफी आणि कर्जमुक्ती झालीच पाहिजे. शेतकऱ्यांना बोनस देण्याचे काम हे फक्त युती सरकारने केले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आ. भरत गोगावले, आ. प्रकाश सुर्वे, आ. प्रवीण दरेकर, तुकाराम काते, नावीद अंतुले, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड