मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढताना पाहायला मिळत आहेत. यामुळे देशातील सामान्य जनता त्रस्त झालेली पाहायला मिळत आहे. मात्र, पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. इंधनदरवाढ, महागाई यावरून विरोधक केंद्रातील मोदी सरकारवर टीका करत आहेत. यातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी, यामुळे केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, असा टोला लगावला आहे. (rohit pawar criticised modi govt over fuel price hike)
मे महिन्यात पश्चिम बंगालसह चार राज्यांच्या निवडणुका संपताच पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरवाढीचा सपाटा लावला होता. आतापर्यंत पेट्रोलियम कंपन्यांनी ४२ वेळा पेट्रोल दरवाढ केली आहे. ज्यात पेट्रोल ११.५२ रुपयांनी महागले आहे. तर डिझेलमध्ये देखील याच कालावधीत जवळपास १० रुपयांची वाढ झाली आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून, याचे पडसाद संसदेच्या पावसाळी अधिवेशनात उमटल्याचे पाहायला मिळत आहे. यातच रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून टोला लगावला आहे.
“काही नेत्यांच्या अती आत्मविश्वासामुळे भाजपचा पश्चिम बंगालमध्ये पराभव झाला”
पण काही का असेना...
महागाईच्या ओणव्यात आज सामान्य माणूस भाजून निघतोय, पण चक्क दोन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर वाढले नाहीत. कदाचित आजपासून सुरू होणाऱ्या संसद अधिवेशनात टीकेची तीव्रता कमी व्हावी म्हणून ते स्थिर असावेत! पण काही का असेना... यामुळं केंद्र सरकारचे मानावे तेवढे आभार कमी आहेत!, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.
लोकसभेचे कामकाज स्थगित
लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन सुरू झाले आहे. संसदेच्या कामकाजाला सुरूवात होताच विरोधकांनी गदारोळ करण्यास सुरूवात केली. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधन सुरू केले. नवीन मंत्र्यांचा परिचय करून देण्यास सुरुवात केली. मात्र, विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज सुरुवातीला स्थगित करण्यात आले.
नोकरीची सुवर्ण संधी! TCS, Infosys, Wipro एक लाख कर्मचाऱ्यांची करणार भरती
दरम्यान, आताच्या घडीला मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०७.८३ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल १०१.८४ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०२.४९ रुपये इतका आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०२.०८ रुपये झाले आहे. मुंबईत डिझेलचा भाव ९७.४५ रुपयांवर कायम आहे. दिल्लीत डिझेल ८९.८७ रुपये आहे. चेन्नईत ९३.६३ रुपये आणि कोलकात्यात डिझेलचा भाव ९३.०२ रुपये प्रती लीटर झाला आहे.