मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण गेले. त्यामुळे ओबीसींवर मोठा अन्याय झाला आहे. ओबीसींना पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी मी केंद्र सरकारमध्ये प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. (rpi chief ramdas athawale criticizes thackeray govt over obc reservation)
गेल्या काही दिवासांपासून मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण या दोन मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण ढवळून निघताना पाहायला मिळत आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या विषयावरून भाजपने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले. या एकूण प्रकरणावर रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे.
“देवेंद्र फडणवीस धनगर आरक्षणाबाबतही असंच बोलले होते”; राऊतांचा पलटवार
आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा सदैव पाठिंबा
ओबीसी आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा सदैव पाठिंबा राहिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे आरक्षण गेल्यामुळे ओबीसींवर मोठा अन्याय झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात ओबीसी आरक्षणाची योग्य बाजू मांडली नसल्यामुळे ओबीसी समाजाचे आरक्षण घालविण्यात आले. त्यास उद्धव ठाकरे सरकार जबाबदार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे, असे रामदास आठवले म्हणाले.
...त्यानंतरच लोकल प्रवासासाठी मुभा; ठाकरे सरकारचा नवा नियम?
पंतप्रधान मोदींची भेट घेऊन विषय मांडला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अलीकडेच भेट घेऊन ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याबाबतचा विषय आपण मांडला होता. यापुढेही ओबीसी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण केंद्र सरकारमध्ये प्रयत्नशील राहणार असल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
संघर्ष नको मग संवादातून मार्ग का काढत नाही?; भाजपचा ठाकरे सरकारला सवाल
दरम्यान, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपने आक्रमक भूमिका घेतली असून, राज्यभरात भाजप नेते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, नागपूर, नाशिक अशा महत्त्वाच्या शहरांत तसेच तालुक्यांच्या ठिकाणी ओबीसी आरक्षण परत मिळावे, यासाठी भाजपने एल्गार केला. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडले.