RSS लग्नाला कंत्राट समजते, त्यावर भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांचे म्हणणं काय? नाना पटोलेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 12:09 PM2021-03-08T12:09:15+5:302021-03-08T12:12:49+5:30

nana patole criticizes bjp over rss ideology of marriage : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यावरून नाना पटोले यांनी भाजपाला टोला लगावला.

RSS considers marriage as a contract, what do BJP women activists say about it? Question from Nana Patole | RSS लग्नाला कंत्राट समजते, त्यावर भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांचे म्हणणं काय? नाना पटोलेंचा सवाल

RSS लग्नाला कंत्राट समजते, त्यावर भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांचे म्हणणं काय? नाना पटोलेंचा सवाल

Next
ठळक मुद्देसोमवारी विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी नाना पटोले यांनी संवाद साधला.नाना पटोले यांनी नाणारवरूनही काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली.

मुंबई: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू आहे. त्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाच्या महिला कार्यकर्त्या आंदोलन करत आहेत. मात्र, त्यांची मातृसंस्था असलेली आरएसएस लग्नाला कंत्राट समजते, त्यावर त्यांचे काय म्हणणे आहे, असा सवाल नाना पटोले केला आहे. (nana patole criticizes bjp over rss ideology of marriage) 

सोमवारी विधानभवन परिसरात प्रसार माध्यमांशी नाना पटोले यांनी संवाद साधला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यावरून नाना पटोले यांनी भाजपाला टोला लगावला. भाजपाच्या महिला कार्यकर्त्या आंदोलन करत आहेत. त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांची मातृसंस्था असलेल्या संघाचे मत काय आहे. ते लग्नाला कंत्राट समजतात, त्यावर त्यांचे म्हणणे काय आहे, असे नाना पटोले म्हणाले.

याचबरोबर, नाना पटोले यांनी नाणारवरूनही काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. नाणार प्रकल्प कोकणात होत असेल तर हरकत नाही. परंतु हा प्रकल्प कोकणात होणार नसेल तर तो विदर्भात झाला पाहिजे, ही आमची मागणी आहे, असेही नाना पटोले म्हणाले. दरम्यान, आज विधान सभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. यावरही नाना पटोले यांनी भाष्य केले. अर्थसंकल्पातून सर्वांनाच अपेक्षा असतात. चांगला अर्थसंकल्प मिळेल ही अपेक्षा असते, असे नाना पटोले म्हणाले.

पत्राद्वारे काय म्हणाले राज ठाकरे?
महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर 'रत्नागिरी राजापूर रिफायनरी' म्हणजेच नाणार सारखा प्रकल्प हातातून गमावणे कोकणाला आणि महाराष्ट्राला परवडण्यासारखे नाही, अशी भूमिका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मांडली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज ठाकरे यांनी नाणार रिफायनरीबाबत सर्वांगाने विचार करण्याची मागणी केली आहे. 

तसेच, कोकणावर निसर्गाने सौंदर्याची जितकी मुक्त उधळण केली आहे तितकी इतर ठिकाणी फारशी आढळत नाही ह्या विषयी कोणाचंच दुमत असू शकत नाही. प्रत्येक पर्यटन स्थळ हे एखाद्याच विशिष्ट ऋतूत खुलून दिसतं आणि इतर वेळेस ते तितकं मनाला भावत नाही. पण कोकणच्या बाबतीत मात्र निसर्गाने कमाल केली आहे. तिन्ही ऋतूत कोकण सुंदर दिसू शकतं आणि म्हणूनच पर्यटन हा कोकणाचा आणि पर्यायाने माझ्या कोकणी माणसाच्या जगण्याचा श्वास होऊ शकतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

Web Title: RSS considers marriage as a contract, what do BJP women activists say about it? Question from Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.