मुंबई: अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेच्या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात जुंपली. त्यामुळे अधिवेशन वादळी होणार असल्याचं पहिल्याच दिवशी दिसून आलं. त्यातच आता मुस्लिम आरक्षणाच्या मुद्यावरून शिवसेना अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. (samajwadi party mla abu azmi muslim demands muslim reservation)ओलीस ठेवता का? भीक देत नाही; अजित पवार-फडणवीसांमध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जुंपलीमहाविकास आघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्षानं मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या अडचणी वाढू शकतात. मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्याचं मागणी समाजवादी पक्षानं केली आहे. समाजवादी पक्षाच्या दोन आमदारांनी यासाठी फलक घेऊन विधिमंडळ परिसरात घोषणा दिल्या. नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधात प्रस्ताव आणण्याची मागणीदेखील त्यांनी केली. प्रस्ताव न आणल्यास सरकारविरोधात रस्त्यावर उतरू असा इशारादेखील त्यांनी दिला."धडधडीत खोटं बोलावं लागतं तेव्हा नैतिक बळ येत नाही", फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणासमाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी मुस्लिम आरक्षण, सीएए, एनआरसीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मंत्री अस्लम शेख यांनी सरकारच्या वतीनं उत्तर दिलं. 'आम्ही मुस्लिम आरक्षणाशी कटिबद्ध आहोत. पुढील काही दिवसांत याबद्दलचा निर्णय घेतला जाईल,' असं शेख म्हणाले. राज्यात एनआरसी, सीएए विरोधात आंदोलनं झाली आहेत. त्यामुळे त्यावर बोलण्याचा प्रश्नच येत नाहीत, असंदेखील त्यांनी पुढे म्हटलं.शिवसेना अडचणीत येणार?समाजवादी पक्षानं केलेली मागणी आणि त्याला मंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख यांनी दिलेलं उत्तर शिवसेनेसाठी अडचणीचं ठरू शकतं. काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका मुस्लिम आरक्षणाच्या बाजूनं आहे. पण शिवसेनेची विचारधारा हिंदुत्ववादी असल्यानं त्यांना मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा अडचणीचा ठरू शकतो. काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडल्याची टीका अनेकदा भाजपकडून होत असते. त्यामुळे मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा अर्थसंकल्पी अधिवेशनात शिवसेनेसाठी अडचणीचा ठरू शकतो.
महाविकास आघाडीतल्या 'या' छोट्या पक्षामुळे शिवसेना मोठ्या अडचणीत? भाजप आक्रमक होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 2:40 PM