नाशिक: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ तुरुंगात असताना त्यांचा पुतण्या समीर भुजबळ माझ्या भेटीला आला होता. जामीन मिळावा यासाठी त्यांनी माझ्याकडे विनंती केली होती, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. मात्र पाटील यांच्या दाव्यात कोणतंही तथ्य नसल्याचं भुजबळांनी सांगितलं. समीर भुजबळ आधी तुरुंगात गेला. त्यानंतर मी तुरुंगात गेलो. मग समीर जामिनासाठी पाटलांकडे जाईल हे कसं काय शक्य आहे, असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला."जामिनावर सुटला आहात, जोरात बोलू नका अन्यथा महागात पडेल", चंद्रकांत पाटलांचा भुजबळांना इशाराभुजबळांविरोधात आजही न्यायालयात खटले सुरू आहेत. त्यांनी महागात पडेल, अशा धमक्या चंद्रकांत पाटील देतात. त्याचा अर्थ काय होतो, असा प्रश्न भुजबळांनी विचारला. 'सक्तवसुली संचलनालय, सीबीआय केंद्राच्या इशाऱ्यावर काम करतात हे उघड आहे. पण आता न्यायालयदेखील केंद्राच्या ताब्यात आहे, असं पाटील सुचवू पाहत आहेत का? कारण त्यांच्या विधानातून तोच अर्थ निघतो,' असं भुजबळ म्हणाले. मी तुरुंगात जाण्याआधी समीर तुरुंगात गेला होता. त्यामुळे तो पाटील यांना त्यांच्या बंगल्यावर जाऊन कसा भेटू शकेल? असा उपस्थित करताना आमच्याकडे सत्ता असताना आम्हीदेखील भाजपच्या नेत्यांना मदत केली. पण ती कधी उघडपणे सांगितली नाही, असं भुजबळ यांनी म्हटलं.पश्चिम बंगालमधील पराभवामुळे राज्यातील भाजप बॅकफूटवरभविष्यात घडणाऱ्या घटना चंद्रकांत पाटील यांना आधीच कसं काय समजतं, याचा नेमका अर्थ काय, असे सवाल विचारत भुजबळांनी काही घटनाक्रमांकडे लक्ष वेधलं. भुजबळ तुरुंगात जाणार असं पाटील म्हणाले होते. त्यानंतर दोन महिन्यांनी मला अटक झाली. मी तुरुंगात गेलो. अनिल देशमुख यांचं गृहमंत्रिपद जाणार, याचं भाकितही त्यांनी केलं होतं. त्यानंतर ते मंत्री अनिल परब यांच्याविषयी बोलू लागले, असा संपूर्ण घटनाक्रम भुजबळ यांनी सांगितला. भविष्यातील घटना पाटलांना आधीच कशा काय माहीत असतात, असा प्रश्न भुजबळांनी उपस्थित केला.
'तेव्हा' आम्हीसुद्धा भाजपच्या नेत्यांना मदत केली होती; भुजबळांनी सांगितलं 'पॉवर' पॉलिटिक्स
By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 12:05 PM