शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

“हिंमत असेल तर मला अडवून दाखवा”; भाजपा आमदाराच्या गाडीवर हल्ला, बुलडाण्यात वातावरण चिघळलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 5:33 PM

Clashes Between Shivsena and BJP Over MLA Sanjay Gaikwad Controversial Statement on Devendra Fadnavis: तुझ्या मायनं दूध पाजलं असेल तर ५० मीटर माझ्या जवळ येऊन दाखव तुला संजय गायकवाड काय आहे ते दाखवतो अशी धमकी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दिली होती.

ठळक मुद्देमाजी आमदार विजयराज शिंदे यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती. विजयराज शिंदेंना भेटण्यासाठी माजी मंत्री डॉ. संजय कुटे बुलडाण्यात गेले होते. बुलडाण्यात संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी संजय कुटे यांच्या गाडीवर हल्ला केला

बुलडाणा – शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. यावरून शिवसेना-भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं पाहायला मिळत आहे. बुलडाण्यात माजी आमदार विजयराज शिंदे यांना मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे आमदार संजय कुटे यांच्यावरही हल्ला झाल्याची माहिती आहे.(Shivsena MLA Sanjay Gaikwad Part workers attack on BJP Sanjay Kute Car in Buldhana)  

आमदार संजय कुटे यांनी ट्विट करून सांगितले की, माझ्या गाडीवर बुलडाणा येथे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. आता मी संजय गायकवाड यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होत नाही तोपर्यंत मी बुलडाणा शहर सोडणार नाही, मी परत बुलडाणा शहरात येतोय हिंमत असेल मला अडवून दाखवावे असा इशाराच त्यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना दिला आहे. आमदार संजय कुटे हे विजयराज शिंदे यांना भेटण्यासाठी बुलडाण्यात गेले होते. त्यावेळी हा हल्ला झाला.

संजय गायकवाड यांनी दिली होती धमकी

संजय कुटेसारखे आमदार दारू पिऊन वावरात पडलेले असतात. त्याला सर्व शौक आहे तो मवाली आहे. तुझ्या मायनं दूध पाजलं असेल तर ५० मीटर माझ्या जवळ येऊन दाखव तुला संजय गायकवाड काय आहे ते दाखवतो अशी धमकी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दिली होती.

माजी आमदार विजयराज शिंदेंनाही मारहाण

भाजपचे नेते तथा माजी आमदार विजयराज शिंदे १८ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास जयस्तंभ चौकात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा निषेध करण्यासाठी जमले होते. यावेळी गायकवाड यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला असता यावेळी आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना त्यास विरोध केला. दोन्ही गटात शाब्दिक बाचाबाची होऊन राडा झाला. त्यावेळी झालेल्या हाणामारीत तीन ते चार जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांच्या मध्यस्थीने प्रकरण निवळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

फडणवीस व कुटे यांच्या पुतळ्याचे दहन

बुलडाण्यातील या घटनेनंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी मोताळा आणि सिंदखेडराजा येथे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तर बुलडाण्यात भाजपचे माजी मंत्री संजय कुटे यांच्या पुतळ्याचे दहन केले. त्यामुळे सध्या शहरात  वातावरण तणावपूर्ण असल्याचे चित्र आहे.

काय आहे प्रकरण?

आमदार संजय गायकवाड यांनी कोरोनासंदर्भात भाजपा करत असलेल्या राजकारणाविरोधात वक्तव्य केले. त्यावेळी त्यांनी ‘कोरोनाचे जंतू सापडले तर फडणवीसांच्या तोंडात टाकले असते’ असे वक्तव्य केले होते. सोबतच भाजपच्या नेत्यांवर सडकून टीका केली होती. त्यानंतर हे संपूर्ण राजकारण पेटले आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाSanjay Gaikwadसंजय गायकवाडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस