नवी दिल्ली - कोरोनामुळे देशात गंभीर वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. उत्तर प्रदेशमध्येही कोरोनाचे रुग्ण हे आढळून येत आहेत. याच दरम्यान आम आदमी पार्टीने योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. आम आदमी पार्टीचे प्रमुख प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या नावाखाली मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. आपनेहीआपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये वैद्यकीय सामान खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचं सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं आहे. राज्यातील 65 जिल्ह्यांमधील एक लाख ग्रामपंचायतीमध्ये कोरोनाा किटच्या खरेदीत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बाजारात कोरोना किट (थर्मामीटर, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर आणि मास्क) 2700 ते 2800 रुपयांपर्यंत मिळतं. मात्र येथे कोरोनामध्ये अत्यावश्यक वस्तूंच्या किंमती 300 ते 500 टक्क्यांनी वाढवण्यात आल्याचं आपने म्हटलं आहे.
"उत्तर प्रदेशमधील अनेक ठिकाणी भ्रष्टाचार झाला"
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रोज सकाळी कोरोना संदर्भात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतात. मात्र इतका मोठा भ्रष्टाचार झाल्याचं त्यांना माहीत नाही. हे कसं शक्य आहे असं देखील आपने म्हटलं आहे. "उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपा सरकारने एक आदेश जारी केला. त्यानुसार राज्यातील प्रत्येक पंचायतीला राज्य सरकारकडून कोरोना कीट देण्यात येईल असं सांगण्यात आलं. यामध्ये एक ऑक्सिमीटर, एक इन्फ्रारेड थर्मोमीटर, 500 मास्क, पाच लीटर सॅनिटायझर या गोष्टींचा समावेश होता. एका कीटची किंमत अंदाज 2700 ते 2800 रुपये इतकी होती. मात्र दुर्देवाने उत्तर प्रदेशमधील अनेक ठिकाणी यामध्ये भ्रष्टाचार झाला" असं त्यांनी म्हटलं आहे.
"#योगी_का_कोरोना_घोटाला’ या हॅशटॅगच्या अंतर्गत ट्विट"
कोरोना संदर्भातील भ्रष्टाचाराच्या या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणीही आम आदमी पार्टीने केली आहे. आपने आपल्या ट्विटर काऊंटवरून "#योगी_का_कोरोना_घोटाला" या हॅशटॅगच्या अंतर्गत अनेक ट्विट केले आहेत. कोरोना किटमध्ये कशापद्धतीने घोटाळा झाला हे यामधून सांगण्यात आले आहे. तसेच योगी सरकारवर अनेक आरोप देखील करण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : अरे व्वा! 105 वर्षीय आजींनी जिंकली कोरोनाची लढाई, व्हायरसवर केली यशस्वी मात
"देशात भीतीचं वातावरण, संसदेत 'या' मुद्द्यांवर चर्चा होणं आवश्यक"
"ही तर राज्यपुरस्कृत दहशत, आरोपींची 10 मिनिटांत सुटका", फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल
CoronaVirus News : जगभरात 150 हून अधिक कोरोना लसींवर संशोधन, जाणून घ्या लस विकसित करण्याची पद्धत