"३० वर्षे काँग्रेसची सेवा केली, पण रोजीरोटीची सोय करू शकलो नाही’’, हाताश कार्यकर्त्याची मेसेज पाठवून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 04:49 PM2021-07-30T16:49:09+5:302021-07-30T16:51:02+5:30

Congress Politics News: एकीकडे बड्या नेत्यांमध्ये वर्चस्वासाठी धमासान सुरू असताना पंजाब काँग्रेसमधून अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंजाब काँग्रेसमधील एका कार्यकर्त्यांने प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांना व्हाइस मेसेज पाठवून आत्महत्या केली आहे.

"Served Congress for 30 years, but couldn't make a living", suicide note sent by Party activist | "३० वर्षे काँग्रेसची सेवा केली, पण रोजीरोटीची सोय करू शकलो नाही’’, हाताश कार्यकर्त्याची मेसेज पाठवून आत्महत्या

"३० वर्षे काँग्रेसची सेवा केली, पण रोजीरोटीची सोय करू शकलो नाही’’, हाताश कार्यकर्त्याची मेसेज पाठवून आत्महत्या

Next

चंदिगड -  पंजाबमध्येकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नवज्योत सिंग सिद्धू यांची निवड झाली आहे. मात्र पंजाबकाँग्रेसमधील वाद आणि मतभेद अद्याप दूर झालेले नाहीत. एकीकडे बड्या नेत्यांमध्ये वर्चस्वासाठी धमासान सुरू असताना पंजाब काँग्रेसमधून अजून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंजाब काँग्रेसमधील एका कार्यकर्त्यांने प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांना व्हाइस मेसेज पाठवून आत्महत्या केली आहे. ("Served Congress for 30 years, but couldn't make a living", suicide note sent by Party activist)

दलजीत सिंग जांगपूर उर्फ हॅपी सिंग असे आत्महत्या केलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे नाव आहे. त्याने नवज्योत सिंग सिद्धू यांना एक व्हाईस मेसेज पाठवून आपल्या दुरावस्थेबाबत माहिती दिली होती. दलजीत सिंग हा कार्यकर्ता दाखामधील जांगपूर गावातील रहिवासी होता. दलजीत याने काल विषप्राशन करून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुमारे १० मिनिटांचा व्हाईस मेसेज पाठवला होता. 

या व्हाईस मेसेजमध्ये दलजीत सिंग म्हणाला की, सिद्धूजी तुम्ही प्रदेशाध्यक्ष बनला आहात. तुम्हाला शुभेच्छा. आता तुम्ही माझ्यासारख्या काँग्रेसची कार्यकर्त्यांचा हात पकडा. माझं सगळं संपल आहे. माझ्याकडील वेळ संपली आहे. मात्र माझ्या कुटुंबाला नक्की साथ द्या. मी जे काम करायला जात आहे, तसे काम हे स्वत:मधील विवेकाला मारून केले जाते. पण अखेर तेच होते जे देवाला मान्य असते.

दलजीत पुढे म्हणतो की, मी काँग्रेसचा खूप जूना कार्यकर्ता आहे. मी यूथ काँग्रेसमध्ये काम केले. राहुल गांधींच्या इलेक्शन कमिशनमध्ये आलो होते. इलेक्शन कमिशननंतर मी अनेक राज्यांमध्ये काम केले. हरियाणामध्ये सुरजेवाला यांच्या प्रदेशात मी काम केले. तत्पूर्वी जेव्हा बिट्टू प्रमुख बनले होते तेव्हा मी त्यांचे प्रतिनिधित्व केले होते. हरियाणा, हिमाचल, राजस्थान, मध्य प्रदेश येथे मी काम केले आहे. मी मध्य प्रदेशला तीन वेळा जाऊन आलोय. तिथे मी काँग्रेसचा को-ऑर्डिनेटर म्हणून गेलो होतो. मी गुजरातमध्येही काम केले आहे.

दरम्यान, या मेसेजमध्ये काँग्रेसच्या या कार्यकर्त्याने आपल्या आर्थिक परिस्थितीचाही उल्लेख केला आहे. मी एका गरीब कुटुंबाशी संबंधित आहे. तसेच जेव्हा मी पंजाबमध्ये परत आलो तेव्हा कुटुंबासाठी अन्नपाण्याचीही व्यवस्था करू शकलो नाही. माझ्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रारी करण्यात आल्या. मात्र मी पक्षाचा हात सोडला नाही. मात्र पक्षाने माझ्यासाठी काहीच केले नाही. अजूनही मी पक्षासोबतच आहे. प्रधानजी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना सांभाळा. असे खूप कमी कार्यकर्ते आहेत ज्यांनी पक्षासाठी दिवस रात्र एक केली आहे.

दलजीत पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या सरकारमध्येच माझ्याविरोधात ३०७ चा गुन्हा दाखल कऱण्यात आले. त्यात माझा काही सहभाग नव्हता. मात्र तरीही मला क्लीन चिट मिळालेली नाही. माझ्यावर एवढे गुन्हे दाखल आहेत की गेल्या ३० वर्षांत माझे कंबरडे मोडले आहे. जर मी मोलमजुरी केली असती तरी कुटुंबाची परिस्थिती सुधारली असती. मात्र मी माझ्या जीवनातील ३० वर्षे काँग्रेसला दिली. मात्र काँग्रेस माझ्यासाठी अन्नपाण्याचीही व्यवस्था करू शकली नाही.

मी पक्ष सोडू शकत नाही. त्यामुळे हे जग सोडत आहे. माझ्या कुटुंबाला सांभाळा. मी माझा विवाहही केला नाही. माझे संपूर्ण जीवन पक्षाल समर्पित केले. मात्र आज माझ्या पक्षानेच मला हरवले. मात्र असे असले तरी देवाने पुढच्या जन्मातही मला काँग्रेसी म्हणूनच जन्म द्यावा.  

Web Title: "Served Congress for 30 years, but couldn't make a living", suicide note sent by Party activist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.