भाजपाला दे धक्का! पिचडांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल; अजित पवारांची खेळी यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 05:08 PM2021-03-16T17:08:31+5:302021-03-16T17:10:30+5:30

घटना घडत असतात. कोण जात असतं येत असतात. मधुकरराव पिचड हे नेते होते. राष्ट्रवादीकडून त्यांना संधी मिळाली.

Setback to BJP! Madhukar Pichad supporters join NCP, Ajit Pawar Political game in Ahmadnagar | भाजपाला दे धक्का! पिचडांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल; अजित पवारांची खेळी यशस्वी

भाजपाला दे धक्का! पिचडांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल; अजित पवारांची खेळी यशस्वी

googlenewsNext
ठळक मुद्देअठरापगड जातीच्या लोकांना प्रदेशाध्यक्ष पद पवारसाहेबांनी दिले. पिचड यांना आदिवासी समाजाचे म्हणून प्रदेशाध्यक्ष पद दिलेप्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर लहानपणातच सहकाराची जबाबदारी आली होतीवैभव पिचडला खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता. तुमचं भवितव्य आहे परंतु काय झालं माहित नाही त्याने पक्षप्रवेश केला.

 मुंबई - विकासाचा ध्यास घेऊन काम करणारी आम्ही माणसे आहोत. फूट पाडण्याचा प्रयत्न होईल. त्याकडे लक्ष देऊ नका. आपल्या हिताचं काय? भावी पिढीच्या भवितव्याचं काय? हा विचार करा. काळजी करू नका, अंतर पडणार नाही. आता इकडे तिकडे जायचं नाही असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अहमनगरमधील  अकोले तालुक्यातील पिचड समर्थक आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. (Sitaram Gaikar joined NCP in Presence of DCM Ajit Pawar & State President Jayant Patil)

अजित पवार म्हणाले की, घटना घडत असतात. कोण जात असतं येत असतात. मधुकरराव पिचड हे नेते होते. राष्ट्रवादीकडून त्यांना संधी मिळाली. अठरापगड जातीच्या लोकांना प्रदेशाध्यक्ष पद पवारसाहेबांनी दिले. पिचड यांना आदिवासी समाजाचे म्हणून प्रदेशाध्यक्ष पद दिले. त्यांच्याबरोबर अनेकांनाही दिली आणि ही पदे साहेबांमुळे मिळाली आहेत. आमचे सहकाराशी आपलेपणाचे नाते आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर लहानपणातच सहकाराची जबाबदारी आली होती. पवारसाहेबांनी वसंतदादा यांच्यानंतर सहकाराला आधार दिला असं त्यांनी सांगितले.

तसेच वेगवेगळ्या प्रकारे मागण्या पूर्ण करण्याचे काम राष्ट्रवादीमय जिल्हा होता म्हणून काम केले. वैभव पिचडला खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता. तुमचं भवितव्य आहे परंतु काय झालं माहित नाही त्याने पक्षप्रवेश केला. ग्रामीण भागात काटयाने काटा काढायचा असतो ही म्हण प्रचलित आहे. त्यानुसार किरण लहामटे यांना उमेदवारी दिली आणि राष्ट्रवादीचा आमदार मिळाला. राष्ट्रवादीचा आमदार यावा म्हणून प्रयत्न झाला. नगर जिल्हयात चांगली साथ मिळावी. आघाडीचे उमेदवार निवडून येण्यासाठी या जिल्हयाने साथ दिली. आता एकोप्याने पुढे जायचे आहे. दुजाभाव करायचा नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. सत्ता चालवताना अनुभवी लोक लागतात असेही अजित पवार म्हणाले. त्याचसोबत नगर जिल्हा बँकेत काहींनी गम्मत केली. कशी व कुणी केली हे मला माहीत आहे. थोडे दिवस जाऊदे नंतर बघतो एकेकाला असा सज्जड दम अजित पवार यांनी यावेळी भरला.

Web Title: Setback to BJP! Madhukar Pichad supporters join NCP, Ajit Pawar Political game in Ahmadnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.