पंढरीनाथ कुंभार भिवंडी : लोकसभा निवडणुकीसाठी भिवंडी मतदारसंघातून अखेर १५ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात उच्चशिक्षित उमेदवारांचा टक्का २० आहे.१५ पैकी तीन उमेदवार उच्चशिक्षित आहेत. त्यापैकी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अरुण सावंत हे माजी कुलगुरू आहेत. त्याचबरोबर तीन उमेदवार पदव्युत्तर, तर तीन जण पदवीधर आहेत.बारावी आणि त्यापेक्षा कमी शिक्षण असलेल्या उमेदवारांचा टक्का ५३ इतका आहे. तीन उमेदवार बारावी, तर चारजण बारावीपेक्षा कमी शिकलेले आहेत. मतदारसंघातील १५ उमेदवारांपैकी सात अपक्ष, तर उरलेले आठ उमेदवार राजकीय पक्षांचे आहेत. या उमेदवारांच्या शिक्षणाचा एकंदरीत आढावा घेता उमेदवारांपैकी तीन उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.दहावीपुढील शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची संख्या ११ आहे. तर, दहावीपेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या उमेदवारांची टक्केवारी ५३ इतकी असून त्यांची संख्या चार आहे. यातील एक उमेदवार अशिक्षित आहे.>वाणिज्य शाखेचे सर्वाधिक पदवीधरसर्व पदवीधर उमेदवारांमध्ये कला विषयातील सर्वाधिक तीन उमेदवार पदवीधर आहेत. तर, दोन वाणिज्य व दोन वैद्यकीय शाखेतील पदवीधर आहेत. त्यापैकी एक मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू तर, राजस्थान विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. तर, एक वकील आहे.>अल्पशिक्षितांचीभाऊगर्दीभिवंडी मतदारसंघात भिवंडी, कल्याण, बदलापूर ही प्रमुख तीन शहरे येतात. त्यातील मतदार सुशिक्षित आहेत. सध्या रिंगणात असलेले सहा उमेदवार उच्चशिक्षित आहेत. मात्र, उर्वरित नऊ उमेदवार अल्पशिक्षित आहेत. यात दहावी नापास दोन उमेदवार आहेत. आठवी व पाचवी उत्तीर्ण असलेल्या दोन उमेदवारांचा समावेश आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांची संख्या सहा असून उच्चशिक्षितांचा पुढाकार या मतदारसंघात फारसा दिसून येत नाही.>मतदार देतात का राजकीय नेत्याच्या शिक्षणावर भर?सर्वाधिक पदव्याअसलेले तीन उमेदवारसर्वाधिक पदव्या असलेले तीनही उमेदवार राजकीय पक्षांचे असून एका उमेदवाराकडे चार तर दोघांकडे प्रत्येकी दोन पदव्या आहेत. त्यापैकी एकाकडे वाणिज्य पदवीसह वकिली क्षेत्रातील आणि संगणकाची पदवी आहे. तर, दोघांकडे विज्ञानाची पदवी आहे.दहावी, बारावीउत्तीर्णांची संख्या चारदहावी उत्तीर्ण एक, तर बारावी उत्तीर्ण झालेले तीन उमेदवार आहेत. हे चारही उमेदवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, दहावी व त्यापेक्षा कमी शिकलेले तीन उमेदवारही अपक्ष आहेत.अशिक्षित उमेदवारही आखाड्यातएका राजकीय पक्षांच्या उमेदवाराने आपल्या प्रतिज्ञापत्रात शैक्षणिक अर्हतेपुढे ‘नाही’ असे नमूद केले आहे. यावरून अशिक्षित उमेदवारही निवडणूक लढवत असल्याचे स्पष्ट होत आहे. सुशिक्षित मतदार कोणाच्या पदरात मते टाकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
भिवंडी मतदारसंघात सात पदवीधर उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:52 AM