Jarandeshwar Sugar Mill: “सत्तेचा पूरेपूर गैरवापर करुन अजित पवारांनी कारखाना मिळवला”: शालिनीताई पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 02:31 PM2021-07-02T14:31:59+5:302021-07-02T14:34:28+5:30

Jarandeshwar Sugar Mill: जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

shalinitai patil alleged ajit pawar about jarandeshwar sugar mill | Jarandeshwar Sugar Mill: “सत्तेचा पूरेपूर गैरवापर करुन अजित पवारांनी कारखाना मिळवला”: शालिनीताई पाटील

Jarandeshwar Sugar Mill: “सत्तेचा पूरेपूर गैरवापर करुन अजित पवारांनी कारखाना मिळवला”: शालिनीताई पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देदेवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोचतेव्हा आम्ही काही करु शकलो नाही, आता ईडीने आम्हाला पाठिंबा दिलाजरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांची प्रतिक्रिया

सातारा: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने (ED) गुरुवारी मोठी कारवाई केली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar)यांच्या नातेवाईकांचा साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यावर जप्त करण्यात आला आहे. यावरूनही आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. अशातच जरंडेश्वर कारखान्याच्या संस्थापक आणि माजी संचालक शालिनीताई पाटील यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून, सत्तेचा पूरेपूर गैरवापर करुन अजित पवारांनी कारखाना मिळवला, असा आरोप त्यांनी केला आहे. (shalinitai patil alleged ajit pawar about jarandeshwar sugar mill) 

देवाच्या काठीला आवाज नसतो. शंभर अपराध भरले की फटका बसतोच, असे सांगत थोडा उशीर झाला पण आता ईडीने कारवाई केली असून आम्हाला न्याय मिळाला आहे. वास्तविक २०१९ मध्ये अण्णा हजारे, माणिकराव जाधव, अरोरा आणि मी अशा चार जणांनी अर्ज केला होता. अरोरा यांनी नंतर माघार घेतली, असे शालिनीताई पाटील यांनी सांगितले. तसेच आताच्या घडीला कारखाना आणि त्यासंबंधित अन्य मालमत्तांची एकूण किंमत १५०० कोटी रुपये आहे. मात्र, त्यावेळी केवळ ६३ कोटी रुपयांना कारखाना खरेदी केला. त्यानंतर त्या जमिनींवर ६०० ते ७०० कोटींचे कर्ज घेण्यात आले. याचाच अर्थ जमिनींची किंमत किमान हजार कोटींच्या घरात असल्याचे त्यांनी सांगितले.

“केंद्राला आरक्षण द्यायचे नसेल तर...”; नवाब मलिकांनी सूचवला महत्त्वाचा पर्याय

आम्ही काही करु शकलो नाही

एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना, आमच्या कारखान्याचा कर्जाचा हफ्ता भरण्यासाठी थोडा उशीर झाला होता. केवळ तीन कोटींचा हफ्ता शिल्लक असताना त्यांनी कारखाना विकला. आमच्या कारखान्याचे त्यांच्याकडे जे अकाऊंट आहे त्या खात्यात आठ कोटी ३४ लाख जमा होते. ते पैसे वळवण्यास सांगितले असता दुर्लक्ष करण्यात आले. सरकारची आमच्या कर्जाला हमी होती. त्यामुळे सरकारकडे जाता आले असते. मात्र बँकेत अजित पवार, खरेदी करणारे अजित पवार त्यामुळे आम्ही काही करु शकलो नाही. विचारणारे कोणी नव्हते. त्यांनी सत्तेचा पुरेपूर वापर गेला, गैरफायदा घेतला, असे शालिनीताई पाटील यांनी सांगितले. 

“नव्या पिढीला आता भीती वाटतेय, तातडीने लक्ष घाला”; पवारांची पडळकरांविरोधात मोदींकडे तक्रार

ईडीने आम्हाला पाठिंबा दिला

२०१९ मध्ये आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला होता. त्यावेळी ईडीने एफआयआर दाखल करुन घेतला होता. पण काहीच कारवाई न झाल्याने दुसरा अर्ज करण्यात आला. त्याला ईडीने आम्हाला पाठिंबा दिला. भ्रष्टाचार झाला असल्याचे त्यांनी मान्य केले. यामुळे २७ हजार सभासदांना न्याय मिळाला आहे. लोकांनी माझ्यावर नेहमीच विश्वास ठेवला. केवळ एक अपवाद सोडला तर कधी निवडणूकही कारखान्यात झाली नाही, असे शालिनीताई पाटील यांनी नमूद केले. 

देशाची अर्थव्यवस्था २०२५ पर्यंत ५ ट्रिलियन डॉलर्स शक्य! नितीन गडकरींनी सूचवला भन्नाट उपाय

दरम्यान, जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना लिलावात ‘गुरू कमोडिटी’ या कंपनीने खरेदी केला होता. या कंपनीने हा कारखाना लगेचच जरंडेश्वर शुगर्स या कंपनीला भाडेतत्त्वावर दिला होता. या कंपनीत ‘स्पार्क लिंग सॉईल प्रा. लिमिटेड’ या कंपनीचा मोठा हिस्सा आहे. स्पार्क लिंग कंपनी ही अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित असल्याचे ‘ईडी’चे म्हणणे आहे.  
 

Web Title: shalinitai patil alleged ajit pawar about jarandeshwar sugar mill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.