शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
2
कधीकाळी जिगरी दोस्त होते इराण-इस्रायल; जानी दुश्मन कसे बनले? सद्दामच्या इराकवर केलेला हल्ला
3
१९७१ आम्ही विसरलो नाही, आधी माफी मागा; बांगलादेशने पाकिस्तानला करून दिली आठवण
4
ख्रिस गेलचा PM मोदींना 'नमस्कार'! भारतीयांना ती शैली भावली; 'युनिव्हर्सल बॉस'ची लक्षवेधी पोस्ट 
5
Sarva Pitru Amavasya 2024: 'या' ठिकाणी करता येते जिवंतपणी श्राद्ध; मात्र हा तोडगा कोणासाठी? वाचा!
6
"रोहित पवार, रोहित पाटील, टोपेंसह ५० उमेदवारांना पाडणार", लक्ष्मण हाकेंची यादी तयार!
7
अजित पवारांनी तटकरे, पटेलांसह घेतली अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यावर चर्चा?
8
Raj Thackeray : "कितीही बेताल वक्तव्य केली तरी..."; गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारलं
9
कमाल! WhatsApp ची मोठी घोषणा, Video कॉलचा आनंद द्विगुणित; बदलणार चॅटिंगचा एक्सपीरियन्स
10
T20 WC 2024 : भारताचा विजयरथ! न्यूझीलंड, आफ्रिकेविरुद्ध 'भारी' सराव; गुरुवारपासून स्पर्धेचा थरार
11
फक्त 6 तास अ्न मोसाद इराणचे 100000 हून अधिक सीक्रेट न्यूक्लिअर डॉक्यूमेन्ट घेऊन 'भूर्र'; माजी राष्ट्रपतींचा दावा
12
गोविंदा गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, पोलिसांनी व्यक्त केला संशय
13
मुलगी झाली हो..! खुशबू तावडे आणि संग्राम साळवी दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
14
गुरु-शनी गोचर: ८ राशींचा सुवर्णकाळ, धनलक्ष्मी भरभरुन देईल; नवदुर्गा कृपा करेल, दसरा शुभ होईल!
15
इराण-इस्रायल या दोन्ही दैशांपैकी भारताचा सर्वात जवळचा मित्र कोण?; जाणून घ्या
16
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय तरी काय? आता Babar Azam चा कर्णधारपदाचा राजीनामा!
17
गोविंदाला कधी मिळणार डिस्चार्ज? अभिनेत्याच्या तब्येतीविषयी पत्नी सुनिता आहुजा यांनी दिली माहिती
18
"शिवसेनेमुळे माझा पराभव झाला", समरजित सिंह घाटगेंचं मोठं विधान
19
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
20
Irani Cup 2024 : अजिंक्य रहाणेचे शतक थोडक्यात हुकले! पण सर्फराजने गड गाठलाच; ऋतुराजचा संघ अडचणीत

“ठाकरे सरकार पुढच्या वर्षी बरखास्त होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य येईल”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 4:05 PM

समाजाविषयी देणे-घेणे नसणारे हे सरकार पुढच्या वर्षी बरखास्त होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य येईल, असा दावा करण्यात आला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीतअमित शहा आपल्याला नक्कीच सहकार्य करतीलठाकरे सरकार पुढच्या वर्षी बरखास्त होईल आणि पुन्हा रामराज्य येईल

सातारा: गेल्या काही कालावधीपासून राज्यातील राजकारण अनेकविध विषयांवरून ढवळून निघाले असून, सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्या आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून त्या पडण्याबाबत शक्यता वर्तवल्या जात आहेत. भाजप यात आघाडीवर असल्याचे दिसत आहे. यातच आता माजी मंत्र्यांनी ठाकरे सरकारबाबत भाकित वर्तवले असून, समाजाविषयी देणे-घेणे नसणारे हे सरकार पुढच्या वर्षी बरखास्त होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य येईल, असा दावा करण्यात आला आहे. (shalinitai patil claims thackeray govt will be sacked next year and ramrajya in maharashtra ruled again)

“ही जनआशीर्वाद नाही तर जन छळवणूक यात्रा”; शिवसेनेचा भाजपला टोला

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील (Dr. Shalinitai Patil) या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या  वार्षिक सभेत बोलत होत्या. जरंडेश्वर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी ईडीने (ED) योग्य तो निर्णय घ्यावा, यासह नऊ ठराव यावेळी सभेत करण्यात आले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही जरंडेश्वरबाबत मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. वसंतरावदादांच्या पेन्शनमधून मी माझा औषधांचा खर्च करत आहे. तुम्ही दिलेली आमदारकी, तसेच सांगलीकरांनी दिलेल्या खासदारकीच्या पेन्शनवर जरंडेश्वरची लढाई लढत आहे, असे शालिनीताई पाटील म्हणाल्या.

राणेंसारख्या विश्वासघातकी माणसाला बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर जाण्याचा नैतिक अधिकार नाही

अमित शहा आपल्याला नक्कीच सहकार्य करतील

जरंडेश्वर साखर कारखाना सभासद शेतकऱ्यांकडून काढून घेण्याचे पाप करणारे राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत. न्यायालयाच्या आदेशानुसार, सभासद शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठीच ईडीने जरंडेश्वर साखर कारखाना ताब्यात घेतला असून, तो लवकरच ईडीकडून आपल्याला मिळेल. सहकारमंत्री अमित शहा आपल्याला नक्कीच सहकार्य करतील, असा विश्वासही शालिनीताई पाटील यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

सेनेला शह देणार! नारायण राणेंवर ‘मिशन ११४’ ची जबाबदारी? BMC निवडणुकीसाठी BJP ची तयारी

राष्ट्रवादीच्या मंडळींना तोंड लपवून बसण्याची वेळ येईल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नामोल्लेख टाळून, शिखर बॅंकेत मोठा गैरव्यवहार झाला आहे. या घोटाळ्यांची पुन्हा चौकशी झाल्यास राष्ट्रवादीच्या मंडळींना घरामध्ये तोंड लपवून बसण्याची वेळ येईल, अशी टीका त्यांनी केली. काही मंत्री जरंडेश्वर सोसायटी मोडून काढायला निघालेत, असे नमूद करत समाजाविषयी देणे-घेणे नसणारे हे सरकार पुढच्या वर्षी बरखास्त होईल आणि महाराष्ट्रात पुन्हा रामराज्य येईल, असा मोठा दावा पाटील यांनी केला. 

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवार