पेटंटच्या क्षेत्रामध्ये भारतीय उत्पादनांना प्रचंड सहाय्य करणा-या शास्त्रज्ञ व पद्मविभूषण विजेते रघुनाथ माशेलकर यांचा सत्कार शरद पवारांच्या हस्ते करण्यात आला.
रघुनाथ माशेलकर शां. म. मुजुमदार धनराज पिल्ले विजय भटकर आदी पुणे परीसरातील सगळ्या पद्म पुरस्कार विजेत्यांचा शरद पवारांच्या हस्ते गौरव करण्यात आला. पुण्याच्या इतिहासात हा योग प्रथमच जुळून आला.
अरूण जेटलींच्या सहका-यांनी गैरव्यवहार केले असतिल परंतु जेटली असलं गलिच्छ काम करतिल असं आपल्याला वाटत नसल्याचं शरद पवार म्हणाले. व्यक्तिगत टीका टाळण्यावर भर द्यायला हवा असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.
ज्या ज्यावेळी शरद पवार लोकमतच्या कार्यालयात आले त्या त्या वेळी त्या शहरामध्ये लोकमत पहिल्या क्रमांकावर पोचला. त्यामुळे लोकमत पुण्यामध्येही प्रथम स्थानावर आल्याची घोषणा लवकरच करू असे लोकमत मीडियाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी मिश्किलपणे सांगितले.
छोट्या राज्यांना पर्याय नसून शक्य असल्यास ती निर्माण व्हावीत असं पवार म्हणाले. अर्थात स्वतंत्र विदर्भ हवा की नको याचा निर्णय तिथल्या जनतेने घ्यायला हवा असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकशाहीमध्ये संख्याबळाचा आदर करायला हवा असं सांगताना पुरेसे संख्याबळ नसल्यामुळेच पंतप्रधानपदाने हुलकावणी दिल्याची भावना शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली.
आयुष्यात मला जवाहरलाल दर्डांचा मोलाचा सहभाग लाभला असल्याची आठवण शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली.
अम़तमहोत्सवी वर्षानिमित्त शरद पवारांचा पुण्यात लोकमतभवनमध्ये गुरुवारी २४ डिसेंबर रोजी काष्ठशिल्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पवारांनी लोकमतच्या संपादकांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.