Sanjay Raut: नरेंद्र मोदी विरुद्ध शरद पवार योग्य, काँग्रेस अनेक राज्यांत इतिहासजमा; संजय राऊतांचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 01:44 PM2021-07-14T13:44:54+5:302021-07-14T13:45:58+5:30
Sanjay Raut talk on Narendra modi vs Sharad pawar, Prashant kishore, Congress politics: निवडणूक राष्ट्रपती पदाची, पंतप्रधान किंवा अन्य कशाची असेल. आपल्या देशात विरोधकांची एकजूट हीच एक गहण समस्या आहे. राज्यातला विरोधी पक्ष बादशाह मानतो. मी सांगेन तेच आणि तोच नेता. या विरोधकांची एकजूट होणे गरजेचे आहे, परंतू त्यांना एक नेता असणे आवश्यक आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टक्कर देण्यासाठी विरोधकांकडे कोणताही चेहरा नाहीय. जोवर विरोधकांकडे असा चेहरा येत नाही, तोवर कोणतीच संधी नाही असे वक्तव्य शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केले आहे. याचवेळी राऊतांनी शरद पवारांसाठी (Sharad Pawar) जोरदार बॅटिंग केली आहे. तर काँग्रेस (Congress) हा इतिहासजमा झालेला पक्ष असल्याचे म्हटल्याने नवा वाद ओढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Sanjay Raut Says congress became histry in many states, Sharad pawar can fight PM Narendra Modi in 2024 Election.)
प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी शरद पवार आणि राहुल गांधी यांना भेटले. यावर राऊतांना विचारले असता, त्यांनी टीएमसी नेत्यांनी प्रशांत किशोर यांच्यामुळे मदत झाल्याचे सांगितले आहे. गांधी कुटुंबाशी भेट झाली, परंतू शरद पवार किंवा गांधींकडून यावर स्पष्टता आली नाही. ते नक्की काय करतायत हे समजलेले नाही. 2024 मध्य़े कोणत्याही चेहऱ्याशिवाय मोदींना हरविणे कठीण असेल. यासाठी शरद पवार योग्य आहेत, असे राऊत म्हणाले. (Prashant Kishor, Sharad pawar meet)
निवडणूक राष्ट्रपती पदाची, पंतप्रधान किंवा अन्य कशाची असेल. आपल्या देशात विरोधकांची एकजूट हीच एक गहण समस्या आहे. राज्यातला विरोधी पक्ष बादशाह मानतो. मी सांगेन तेच आणि तोच नेता. या विरोधकांची एकजूट होणे गरजेचे आहे, परंतू त्यांना एक नेता असणे आवश्यक आहे, असे राऊत म्हणाले.
शरद पवारांनी विरोधकांना एकत्र करण्यात अनेकदा महत्वाची भूमिका निभावली आहे. ते योग्य आहेत. ममता बॅनर्जीदेखील टक्कर देतील असे अनेकांना वाटत आहे. सर्व विरोधकांनी एकत्र बसल्याशिवाय हा तिढा सुटणार नाही. प्रशांत किशोर हे तो चमत्कार करणार असतील तर चांगलेच आहे, असे देखील राऊत यांनी सांगितले.
नाना पटोले फारसे चर्चेत नाहीत...
नाना पटोले जे काही बोललेत त्याचा सरकारच्या स्थिरतेवर होईल असे वाटत नाही. शेवटचा निर्णय सोनिया गांधी घेतील. काँग्रेसला जर वाटत असेल स्वबळावर लढावे, तर शिवसेना-राष्ट्रवादी पक्ष एकत्र लढेल, असे संकेत राऊतांनी दिले. काँग्रेसला जाब विचारण्याच अधिकार हा पवारांना आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसला विचारणा केली असेल, त्याच्याशी शिवसेनेचा संबंध नाही, असे देखील राऊतांनी स्पष्ट केले.
काँग्रेस काही राज्यांत इतिहासजमा...
काँग्रेस पक्ष हा 100 वर्षांहून जुना पक्ष आहे. ऐतिहासिक पक्ष आहे. परंतू आताची परिस्थिती पाहता काँग्रेस काही राज्यांत इतिहासजमा झाला आहे. नाना पटोलेंची वक्तव्ये फारशी चर्चेत नसतात, असे वक्तव्य संजय राऊतांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.