शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही; शरद पवारांचा कोश्यारींना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2021 12:32 PM

Shrarad pawar reaction on governor bhagat singh koshyari: सध्या शेतकरी वर्गाची स्थिती नाजुक आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, कधी नव्हे ते राज्य मोठ्या आर्थिक संकटात आहे. मात्र राज्य सरकार या सर्व अडचणींमधून नक्कीच मार्ग काढेल.

बारामती : घटनेनुसार राज्यसरकारने केलेल्या शिफारशींना मान्यता देणे ही राज्यपालांची जबाबदारी असते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लोकशाहीची आणि घटनेची जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी पाहिला नाही. हा चमत्कार सध्याच्या राज्यपालांनी केला, ही दुर्दैवी गोष्ट आहे, असा टोला ज्येष्ठ नेते शरद पवार (Shrarad pawar ) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लगावला आहे. (never saw governor like bhagat singh koshyari : Sharad Pawar.)

बारामती येथे माध्यमांशी बोलताना, विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्त्या अनेक दिवस उलटल्यानंतरही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रखडवल्या आहेत. यावर भाष्य करताना  पवार म्हणाले, मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांना देखील तत्कालीन राज्यपालांनी अशाप्रकारचा त्रास दिल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये देखील राज्यपाल याच पद्धतीने राज्यशासनाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी मात्र केंद्र सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे, अशा शब्दांत पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

 शेतकरी आंदोलनाला शंभर दिवस उलटून सुद्धा शेतकऱ्यांना खलिस्थानी, दहशतवादी संबोधत असतील तर यावर काय भाष्य करणार. शेतकऱ्यांच्या भूमिकेसंदर्भात केंद्र सरकारने सामंजस्याची भूमिका न घेतल्यामुळे संसदेचे कामकाज बंद पडले. या प्रश्नावर शेतकरी जसे अस्वस्थ आहेत.  तसेच संसद देखील अस्वस्थ आहे. त्यामुळे याबाबतची प्रतिक्रिया उद्याच्या कामकाजात नक्की उमटेल, अशी आशा वाटत असल्याचे पवार म्हणाले.सध्या शेतकरी वर्गाची स्थिती नाजुक आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, कधी नव्हे ते राज्य मोठ्या आर्थिक संकटात आहे. मात्र राज्य सरकार या सर्व अडचणींमधून नक्कीच मार्ग काढेल.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीNCPराष्ट्रवादी काँग्रेस