पालघर : बविआचे चिन्ह शिट्टी हिसकावून घेण्यात सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करणाऱ्यांनी आता सर्वोच्च न्यायालयाच्या चकरा मारण्यासाठी विमानाचा पास काढून ठेवावा असे सांगून या प्रकरणातील सहभागी असणाºयांना अजिबात सोडणार नाही असा सज्जड दमच बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालघर येथे आयोजित पत्रकार परिषदेत भरला.लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे शिट्टी चिन्ह जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाºयांनी गोठविल्याने तीन महिन्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत देखील हे चिन्ह बहुजन विकास आघाडीला वापरता येणार नसल्याने त्यांना पुन्हा रिक्षा याच चिन्हावर निवडणूक लढविण्याची पाळी ओढवुु शकते. या कारणास्तव बविआ पक्षा कडून दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिका ही पुन्हा फेटाळून लावण्यात आल्याने बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष तथा आ. हितेंद्र ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे.उमेदवारी अर्ज मागे घेणे आणि चिन्ह वाटपादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकारी कक्षाच्या आत आणि बाहेर कोण-कोण आले, आत गेले, बाहेर गेले, कोणाच्या दबावाखाली काम सुरू होते याबाबतचे पुरावे मिळविण्याचे काम सध्या सुरू असून सर्वोच्च न्यायालयात आपण जाणार असल्याचे आ. ठाकुरांनी सांगितले.निवडणूक निर्णय अधिकाºयांच्या कार्यालयात एवढा नाठाळपणा केला जात असेल तर मग प्रत्यक्ष निवडणुकीत किती करणार असे सत्ताधाºयांच्या हस्तक्षेपाबद्दल सांगून सध्या पुरावे गोळा करतोय नंतर ठोकू असेही त्यांनी सांगितले. मी म्हणजे कुणीही येऊन हाकायला गरीब गाय नसून दूध देणारी मारकुंडी गाय आहे असा इशारा त्यांनी दिला. निवडणूक निर्णय अधिकाºयांनी इथे दिलेले निर्णय कुठल्यातरी मंत्र्यांच्या दबावाखाली दिले मात्र, पुढे कसे देतात ते बघू असा इशाराही त्यांनी दिला. आरडीसीसह अनेकांना दिल्लीचा पास काढून चकरा मारायला तयार रहावे असा इशारा मी दिला असून याना मी अजिबात सोडणार नाही असे त्यांनी सांगितले.>तांत्रिक प्रक्रियाच बाकीमला मिळालेले रिक्षा हे चिन्ह बदलायचे नव्हते, फक्त तांत्रिक प्रक्रि या पूर्ण करून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करता यावी यासाठी आम्ही निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे पुनर्विचार याचिका दाखल केल्याचे हितेंद्र ठाकुर यांनी सांगितले.
शिट्टीप्रकरणी ठाकुरांचा विरोधकांना सज्जड दम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 5:37 AM