शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

शिरोळे की बापट? भाजपामध्ये संभ्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2019 4:43 AM

पश्चिम महाराष्ट्रातला भाजपाच्या दृष्टीने सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ सध्याच्या घडीला कोणता असेल तर तो पुणे लोकसभा मतदारसंघ होय.

- सुकृत करंदीकरपश्चिम महाराष्ट्रातला भाजपाच्या दृष्टीने सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ सध्याच्या घडीला कोणता असेल तर तो पुणे लोकसभा मतदारसंघ होय. सन २०१४ मध्ये भाजपाने पुणे मतदारसंघ विक्रमी मताधिक्याने जिंकला. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेला नाकारत पुण्यातल्या सहाच्या सहा विधानसभा भाजपाच्या पारड्यात टाकल्या. त्यानंतर दोन वर्षांपूर्वीच्या महापालिका निवडणुकीत तर भाजपाने पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पूर्ण बहुमताने सत्ता हस्तगत केली. आता महापालिकेपासून मुंबई-दिल्लीपर्यंत ‘शत-प्रतिशत भाजपा’ अशी पुण्याची स्थिती आहे. संघटनात्मक पातळीवर कधी नव्हे, इतके सर्व थरातील कार्यकर्ते भाजपाच्या बाजूला आहेत. इतकी ताकद भाजपाला पुण्यात यापूर्वीच्या इतिहासात कधीच लाभलेली नव्हती. या पार्श्वभूमीवर पुणे हा भाजपासाठी केवळ प. महाराष्ट्रातलाच नव्हे, तर संपूर्ण राज्यातला सर्वात सुरक्षित मतदारसंघ म्हणावा लागेल.अर्थात, प्रत्येक निवडणूक वेगळी असते. भाजपाचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांनाच २०१९ मध्ये पुन्हा उमेदवारी मिळणार का, इथून संभ्रम चालू होतो. खासदार म्हणून शिरोळे यांची कामगिरी लक्षणीय असली तरी केलेल्या कामांची प्रसिद्धी आणि जनसंपर्क या पातळीवर शिरोळे कमी पडतात, असे भाजपातून सांगितले जाते. कॅबिनेटमंत्री गिरीश बापट लोकसभेत जाण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे. पालकमंत्री म्हणून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. भाजपाचा उमेदवार कोण, याबद्दलचा निर्णय तूर्तास अधांतरी आहे. काँग्रेस आघाडीकडून कोण उमेदवार येतो, याचा अंदाज घेऊन भाजपाचा उमेदवार निश्चित केला जाऊ शकतो.उमेदवार निवडीबाबत काँग्रेसमध्ये अनेक मतप्रवाह आहेत. आघाडीच्या जागावाटपात पुण्याची जागा काँग्रेसकडे आहे. मात्र राज्यस्तरीय वाटाघाटींमध्ये पुण्याची जागा राष्ट्रवादीकडे जाणार का, ही भीती काँग्रेसजनांना आहे. पुणे काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्लाही आहे. अडीच-तीन लाखांची त्यांची हक्काची मतपेढी येथे आहे. विजयास आवश्यक त्या पुढची मते कोण खेचू शकतो, याबद्दलचे पर्याय तपासले जात आहेत. यातूनच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचे नाव पुढे आले. गायकवाड यांच्यामुळे मतांच्या ध्रुवीकरणाची तसेच काँग्रेसअंतर्गत गटबाजीची भीती निष्ठावंत व्यक्त करतात. त्यामुळेच उमेदवारीचा वाद सध्या दिल्लीदरबारी आहे. पुण्यातली लोकसभा निवडणूक राष्ट्रीय प्रश्नांवरच लढली जाण्याची शक्यता आहे. दोन्ही काँग्रेस एकदिलाने लढल्या तर शक्ती असूनही भाजपाची दमछाक होऊ शकते. पण काँग्रेसला एकसंध कोण ठेवणार, हाच महत्त्वाचा प्रश्न अजून अनुत्तरित आहे.>सध्याची परिस्थितीसंघटनात्मक पातळीवर भाजपाची वाटचाल जोरदार आहे. कधी काळी ठराविक वर्गापुरता मर्यादित भाजपा सर्व स्तरांत पसरला आहे. संघाचे संघटन जोडीला आहे. सन २०१४ पासूनच्या तीन सलग पराभवांनी काँग्रेसमध्ये आलेली मरगळ दूर व्हायला तयार नाही. संघटन मजबूत करण्याला प्राधान्य देण्याऐवजी गटबाजीचा जोर अजून कायम आहे.मनसेच्या विश्वासार्हतेला जोरदार धक्का बसला आहे. मनसे काँग्रेस आघाडीला मदत करणार की स्वतंत्र लढणार, याचा निर्णय अजून न झाल्याने पक्षपातळीवर सामसूम आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांचा स्वतंत्र उमेदवार कोणासाठी डोकेदुखी ठरणार, याबद्दल तर्कवितर्क आहेत. आंबेडकर-ओवेसी यांना मानणारा मोठा वर्ग पुण्यात आहे.

टॅग्स :girish bapatगिरीष बापटLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९