काँग्रेस-अकाली दलाचे कार्यकर्ते भिडले, सुखबीर बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 03:50 PM2021-02-02T15:50:31+5:302021-02-02T15:59:50+5:30

Akali Dal president Sukhbir Singh Badal's : पंजाबच्या जलालाबादमध्ये अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.

Shiromani Akali Dal president Sukhbir Singh Badal's vehicle attacked in Jalalabad | काँग्रेस-अकाली दलाचे कार्यकर्ते भिडले, सुखबीर बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला 

काँग्रेस-अकाली दलाचे कार्यकर्ते भिडले, सुखबीर बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला 

Next

चंदीगड - पंजाबमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. फजिल्काच्या जलालाबादमध्ये मंगळवारी स्थानिक निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेलेल्या दोन पक्षांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. पंजाबच्या जलालाबादमध्ये अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. कारवर गोळीबार झाला आहे. या गोळीबारात तीन कार्यकर्त्यांना गोळी लागल्याची माहिती मिळत आहे. या घटनेचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. 

अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी हा जीवघेणा हल्ला काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्याच्या घटनेनंतर अकाली दल आणि काँग्रेस कार्यकर्ते आपापसात भिडले. याच दरम्यान एकमेकांवर दगडफेकही केली. तसेच गोळीबार देखील करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी केंद्रावर जात असताना ही घटना घडली. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आपापसात भिडले. एकमेकांवर लाठ्याकाठ्या आणि गोळीबारही करण्यात आला. तसेच दगडफेकही करण्यात आली. फिरोजपूरच्या गुरुहरसहायमध्ये या आधी दोन्ही पक्षांमध्ये हाणामारी झाली होती.

अकाली दलाने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल यांच्यावरही प्राणघातक हल्ला केला. त्यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या तीन कार्यकर्त्यांना गोळ्या लागल्या असल्याची माहिती दिली आहे. तसेच पोलिसांना काँग्रेसच्या हल्लेखोर कार्यकर्त्यांविरोधात कारवाई न करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत असा आरोपही अकाली दलाने केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. पंजाबचे काँग्रेस खासदार जसबीर गिल यांनी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून निशाणा साधला आहे. जसबीर गिल यांनी अर्थसंकल्पावरून देखील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

"मोदी सरकारने राज्यांना वसुली केंद्र बनवलं", काँग्रेसचा गंभीर आरोप

इंधनाच्या किंमतींवर लावण्यात आलेला अ‍ॅग्रीकल्चर सेस परत घेण्याची मागणी केली आहे. जगात सर्वाधिक महाग पेट्रोल, डिझेल आणि गॅस आपल्या देशात आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे सरकारकडून लावण्यात आलेला भरमसाठ कर असं गिल यांनी म्हटलं आहे. तसेच मोदी सरकारने राज्यांना वसुली केंद्र बनवलं असल्याचं देखील म्हटलं आहे. जसबीर गिल यांनी या अर्थसंकल्पातही आपल्या अर्थमंत्र्यांनी अ‍ॅग्रीकल्चर सेस लावला आहे. जवळपास 2.5 रुपये प्रती लीटर पेट्रोलवर आणि जवळपास चार रुपये प्रती लीटर डिझेलवर लावण्यात येणार आहे असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे. "शेती आणि वाहतूक यंत्रणा आधीच वाईट परिस्थितीतून जात आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आज शेतकरी रस्त्यावर आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देणं बाजुलाच राहिला पण त्यांच्यावर अधिक भार टाकला जात आहे. बेसिक एक्साईज ड्युटी 11 टक्क्यांच्या जवळपास पोहचली आहे."

Read in English

Web Title: Shiromani Akali Dal president Sukhbir Singh Badal's vehicle attacked in Jalalabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.