मुंबई: जवळपास तीन दशकं एकमेकांचे मित्र राहिलेले शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर एकमेकांचे शत्रू झाले. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं भाजपपासून दूर जात थेट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत घरोबा केला. त्यामुळे राज्यातला सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपला विरोधात बसावं लागलं. तेव्हापासून भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना अनेकदा पाहायला मिळाला. मात्र आता हेच दोन पक्ष मुंबई महापालिकेत एकत्र येऊन दबाव आणत असल्याचा आरोप काँग्रेस नेते रवी राजा यांनी केला आहे."कंगना राणौतने भाजपला खुश करण्यासाठी केली महाराष्ट्राची बदनामी"२०१७ मध्ये शिवसेना आणि भाजपनं स्वतंत्रपणे मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली. त्यात शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला. तर भाजपला शिवसेनेखालोखाल जागा मिळाल्या. यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर भाजपनं विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे पद तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या काँग्रेसला मिळालं. नगरसेवक रवी राजा यांनी विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं. मात्र आता रवी राजा यांनी शिवसेना, भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.ठाणे जिल्ह्यात काँग्रेसचा शिवसेनेला धक्का; नेत्याने शिवबंधन सोडून काँग्रेसचा 'हात' धरलामहापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी भाजपनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र ती याचिका न्यायालयानं फेटाळून लावली. त्यानंतर भाजपनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आता शिवसेना, भाजप काँग्रेसवर दबाव आणत आहेत. भाजपला विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी शिवसेनेच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी दबावतंत्राचा वापर होत आहेत. मात्र काँग्रेस कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडणार नसल्याचं राजा म्हणाले.राज्यातील मोठी राजकीय घडामोड; बाळासाहेब थोरात काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार?'आधी भाजपनं विरोधी पक्षनेते स्वीकारण्यास नकार दिल्यानं महापौर किशोरी पेडणेकर यांनी ते पद काँग्रेसला दिलं. त्यानंतर राजकीय समीकरणं बदलल्यानंतर भाजपला विरोधी पक्षनेतेपदात रस वाटू लागला. त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र न्यायालयानं महापौरांनी केलेली नेमणूक योग्य असल्याचं म्हटलं. मात्र आता विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना, भाजपकडून दबाव आणला जात आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आहे. शिवसेनेनं भाजपच्या पाठिशी राहू, अशा स्वरुपाची भाषा सुरू केली आहे,' असा आरोप राजा यांनी केला.
मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेची हातमिळवणी; काँग्रेस नेत्याच्या आरोपानं खळबळ
By कुणाल गवाणकर | Published: January 04, 2021 6:33 PM