शहरं
Join us  
Trending Stories
1
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
2
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
3
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
4
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
5
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
6
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
8
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
9
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
10
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
11
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
12
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
13
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
14
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
15
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
16
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
17
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
18
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
19
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल

Lok Sabha Election 2019: शिवसेनेकडून 21 उमेदवार जाहीर, लोकसभेच्या पीचवर दोन नवीन फलंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 3:18 PM

अखेर शिवसेनेकडून पहिली उमेदवार यादी जाहीर

मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष भाजपा पाठोपाठ आज शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली. शिवसेनेनं 21 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. शिवसेना यंदा एकूण 23 जागा लढवणार आहेत. शिवसेनेनं पालघर आणि सातारा वगळता सर्व मतदारसंघांचे उमेदवार जाहीर केले आहे. सातारा आणि पालघरचे उमेदवार शिवसेनेकडून रविवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपानं काल महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. त्याआधी काँग्रेस, राष्ट्रवादीनं उमेदवारी याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेची यादी कधी जाहीर होणार याकडे लक्ष लागलं होतं. शिवसेनेनं अपेक्षेप्रमाणे जवळपास सर्व खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. उस्मानाबादमध्ये शिवसेनेनं उमेदवार बदलला आहे. या ठिकाणी रवी गायकवाड यांचा पत्ता कापण्यात आला आहे. एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला विमानात मारहाण केल्यानं ते चर्चेत आले होते. त्यांच्याऐवजी ओमराजे निंबाळकर यांना संधी देण्यात आली आहे. सध्या भाजपाकडे असलेला पालघर मतदारसंघ यंदा शिवसेनेकडे आहे. चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पालघर मतदारसंघात शिवसेना आणि भाजपामध्ये जोरदार संघर्ष झाला होता. शिवसेनेनं चिंतामण वनगा यांच्या मुलाला रिंगणात उतरवलं होतं. तर भाजपानं राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली होती. गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत गावित यांनी वनगा यांचा पराभव केला. या निवडणुकीच्या तोंडावर गावित काँग्रेसमधून भाजपामध्ये आले होते. तर साताऱ्यातून नरेंद्र पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पाटील सध्या भाजपामध्ये आहेत. त्यांनी आजच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आहे.शिवसेनेनं जाहीर केेलेले उमेदवार:उत्तर पश्चिम मुंबई- गजानन किर्तीकरदक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळेकल्याण- श्रीकांत शिंदेठाणे - राजन विचारे रत्नागिरी-सिंधुदुर्ग - विनायक राऊत उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर रायगड- अनंत गीतेहिंगोली- हेमंत पाटीलरामटेक - कृपाल तुमाने कोल्हापूर- संजय मंडलिकहातकणंगले- धैर्यशील मानेशिर्डी- सदाशिव लोखंडेऔरंगाबाद- चंद्रकांत खैरेयवतमाळ- भावना गवळीबुलडाणा- प्रतापराव जाधवअमरावती- आनंदराव अडसूळमावळ- श्रीरंग बारणेशिरुर- शिवाजीराव आढळराव पाटीलद. मुंबई - अरविंद सावंतनाशिक- हेमंत गोडसेपरभणी- संजय जाधव

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकShiv SenaशिवसेनाBJPभाजपा