शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
2
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
3
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
4
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
5
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
6
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
7
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
8
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
9
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
10
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
11
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
12
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
13
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
14
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
15
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
16
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
17
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
18
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
19
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
20
Gold-Silver Rates Today : लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट

"गुजराती माणसानं उद्धव ठाकरेंना आपडा म्हटलं तर तुमचा का तीळ पापडा झालाय?"

By प्रविण मरगळे | Published: January 06, 2021 2:09 PM

भाजपाचे नेते अस्वस्थ आहेत, मुंबईतले गुजराती समाजाचे नेते भाजपामध्ये चिंतेत आहेत, त्यांना कोणीही विचारेनासे झाले आहे असंही शहा यांनी सांगितले. 

ठळक मुद्देभातखळकर गुजराती माणूस स्वाभिमानी आहे, भाजपाने त्याला स्वतःची जागीर समजू नयेमुंबईत फक्त लोढा तुम्हाला हवा बाकी गरीब गुजराती मारवाडी समाज नको म्हणून सर्व भाजपावर गुजराती समाज नाराज मी मुंबईकर म्हणून मुंबईतील सर्व धर्मियाना उद्धव ठाकरे यांनी आपलेपण दिले

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातल्याने आता राजकारण रंगू लागलं आहे, शिवसेनेकडून भाजपाचा पारंपारिक गुजराती मतदार खेचण्यासाठी गुजराती समाजाचा मेळावा घेण्यात येणार आहे, त्यासाठी शिवसेनेने जिलेबी मा फाफडा, उद्धव ठाकरे आपडा असं घोषवाक्य गुजराती भाषेत म्हणत गुजराती समाजाला आवाहन केलं आहे. 

शिवसेनेच्या या खेळीवर भाजपाने जोरदार टीका केली, त्यावर आता शिवसेनेने पलटवार केला आहे. गुजराती माणसाने उद्धव ठाकरे याना आपडा म्हटल्यावर भाजपाच्या अतुल भातखळकर यांचा तीळ पापडा झाला बहुतेक! ते कालपासून नुसता खळ खळ करतायत, अतुल भातखळकर तुम्ही नेमके कोणाचे? भाजपाला मत देणाऱ्या गुजराती माणसांचे की मराठी मातीत जन्मलेल्या मराठी माणसांचे? असा सवाल शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी विचारला आहे. तसेच गुजराती माणसाने बाळासाहेबांच्या शिवसेनेला नेहमी आपले मानले, १९९२-१९९३ च्या दंगलीमध्ये गुजराती बांधवाना खरी मदत केली, संरक्षण दिले ते शिवसेनेने आणि बाळासाहेब ठाकरे यांनी, मी मुंबईकर म्हणून मुंबईतील सर्व धर्मियाना आपलेपण दिले ते उद्धव ठाकरे यांनी, भाजपाने फक्त मतदान होण्यापुरते गुजराती बांधवांना वापरले. आपडो माणस म्हणत नुसती गुजराती बांधव आणि भगिनींची मते घेतली आणि नंतर सगळ्यांना वाऱ्यावर सोडले असा आरोप हेमराज शहा यांनी केला.  

त्याचसोबत भाजपाचे अतुल भातखळकर फार मोठ्या बाता मारत होते म्हणे गुजराती मतदार सोडा मराठी मतदार पण शिवसेनेला मतदान करणार नाही, भातखळकर तुमची अवस्था सध्या घर का ना घाट का अशी झाली आहे, बाबरी यांनी पाडली नाही, राममंदिराचा निर्णय घेतला नाही, पैसा जनतेचा वापरणार, मग श्रेय कसले? असा सवाल आता देशाची जनता तुम्हाला विचारते आहे, देशभरातील गुजराती आणि हिंदूंनी मिळून रामजन्मभूमी आंदोलन पेटवले होते हे तुम्ही विसरलात त्याची फळे आज भलतेच कोणी चाखत आहे, भाजपाचे नेते अस्वस्थ आहेत, मुंबईतले गुजराती समाजाचे नेते भाजपामध्ये चिंतेत आहेत, त्यांना कोणीही विचारेनासे झाले आहे असंही शहा यांनी सांगितले. 

दरम्यान, भातखळकर गुजराती माणूस स्वाभिमानी आहे, भाजपाने त्याला स्वतःची जागीर समजू नये, मुंबईमध्ये उद्धव ठाकरेच आपडा वाटणार कारण ते सुसंस्कृत माणूस आहे, गुजराती माणसाला ते आवडतात , तुम्हाला जळफळाट होण्याचे कारण ज्या गुजराती मतांवर डोळा ठेवून तुम्ही मुंबईत राजकारण करता त्यांनाच तुम्हीनंतर खोटी आश्वासन देऊन फसवता, मुंबईत फक्त लोढा तुम्हाला हवा बाकी गरीब गुजराती मारवाडी समाज नको म्हणून सर्व भाजपावर गुजराती समाज नाराज आहे आणि त्याना शिवसेना आणि उद्धव ठाकरे आपले वाटतात, भाजपच्या पायाखालची वाळू गुजराती समाज सरकावल्या शिवाय राहणार नाही असा इशारा हेमराज शहा यानी भाजपाला दिला आहे. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाAtul Bhatkalkarअतुल भातखळकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका