.. पण प्रत्येक वेळी शिवसेना अधिक जोमानं वाढली, संजय राऊतांचं शाहंना रोखठोक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2021 08:35 PM2021-02-07T20:35:42+5:302021-02-07T20:38:56+5:30

आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेना उरली नसती, अमित शाहंनी साधलेला निशाणा

shiv sena leader sanjay raut criticize bjp leader home minister amit shah commented uddhav thackeray congress | .. पण प्रत्येक वेळी शिवसेना अधिक जोमानं वाढली, संजय राऊतांचं शाहंना रोखठोक उत्तर

.. पण प्रत्येक वेळी शिवसेना अधिक जोमानं वाढली, संजय राऊतांचं शाहंना रोखठोक उत्तर

Next
ठळक मुद्देआम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेना उरली नसती, अमित शाहंनी साधलेला निशाणारजनी पटेल, पृथ्वीराज चव्हाणांचं उदाहरण देत राऊतांचं रोखठोक उत्तर

"बाळासाहेबांच्या सर्व सिद्धांतांना तापी नदीत बुडवून शिवसेनेनं सत्ता मिळवली. पण आम्ही तुमच्या मार्गानं चालणार नाही. आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो तर शिवसेनाच उरली नसती", असं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. ते सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. यानंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या शैलीतच ट्वीट करत रोखठोक उत्तर दिलं आहे. 

"१९७५ मध्ये रजनी पटेल आणि ९० च्या दशकात कदाचित मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल असं भाकित केलं होतं. २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील त्याच गोष्टीचा पुनरूच्चार केला. दोन्ही वेळी शिवसेना आधीपेक्षा अधिक ताकदीनिशी पुढे आली. जय महाराष्ट्र," असं म्हणत राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपलं मत व्यक्त केलं.



अमित शाहंनी शिवसेनेवर निशाणा

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं अमित शाह यांनी सांगितलं. यासोबतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर यावेळी थेट टीका केली. "शिवसेनेनं खोटंनाटं बोलून आमच्याशी दगाबाजी केली. मी बंद खोलीत वचन दिल्याचं म्हटलं गेलं. पण मी असं कोणतंच वचन दिलं नव्हतं. मी बंद खोलीत नव्हे, तर खुलेआम वचन देणारा आणि ते पाळणारा व्यक्ती आहे. बिहार निवडणुकीत फडणवीस प्रभारी असताना आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करू असं वचन दिलं होतं. बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यापेक्षा भाजपच्या जास्त जागा निवडून आल्या, पण आम्ही दिलेलं वचन पाळलं आणि नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्री केलं. आम्ही वचन एकदा दिलं की पाळतो", असं अमित शाह म्हणाले. 
 

आम्ही तुमच्या मार्गावर चाललो असतो, तर शिवसेनाच उरली नसती; अमित शाहंचा हल्लाबोल

शिवसेनेला मुख्यंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं. मग तुमच्या पोस्टरवर मोदींचा फोटो सर्वात मोठा का छापला? मोदींच्या नावानं मतं का मागितली? प्रचारसभेत फडणवीसांना जेव्हा आम्ही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून बोलत होतो. तेव्हा तुम्हा का बोलला नाहीत?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत अमित शाह यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. 

Web Title: shiv sena leader sanjay raut criticize bjp leader home minister amit shah commented uddhav thackeray congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.