रिपब्लिकन वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि 'बार्क'चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील संवाद उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. यानंतरही केंद्रातील भाजप सरकार गप्प का असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. केंद्रात जर आज काँग्रेसचं किंवा अन्य पक्षाचं सरकार असतं आणि भाजपा विरोधात असते त्यांनी यावरून तांडव केलं असतं असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन, सीरम इन्स्टीट्यूमध्ये लागलेली आग अशा अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली."अर्णब गोस्वामी यांच्यासारखी माहिती आपल्या लष्करातल्या जवानानं केली असती तर त्याचं कोर्ट मार्शल केलं असतं. त्याला देशद्रोही ठरवण्यात आलं असतं. त्याला देशाच्या सुरक्षेसाठी धोकाही मानलं असंत. आज केंद्रात काँग्रेस किंवा अन्य कोणत्या पक्षाचं सरकार असतं आणि भाजप विरोधी पक्ष असता तर त्यांनी याविषयावरून तांडव केलं असतं. परंतु आता भाजप गप्प का?," असा सवाल राऊत यांनी केला. तसंच देशाच्या सुरक्षेविषयी, किंवा सुरक्षेला धोका निर्माण होणारी माहिती लीक होती तरी कारवाई का होत नाही? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.मागण्या मान्य करायावेळी बोलताना राऊत यांनी शेतकरी आंदोलनावरही आपलं मत व्यक्त केलं. "सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. सरकारनं माघार घ्यावी असं आपलं म्हणणं नाही. परंतु शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यावर लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजे. शेतकरी मागे हटणार नाहीत. केंद्र सरकारला चर्चेच्या फेऱ्यांचा विक्रम करायचा आहे का?," असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला. तसंच सीरम इन्स्टीट्युटमध्ये लागलेल्या आगीवर बोलताना हा संवेदनशील विषय असल्याचं सांगत तो कट नसून अपघात असल्याचंही ते म्हणाले.
केंद्रात आज दुसरं सरकार असतं तर भाजपनं तांडव केलं असतं; अर्णब गोस्वामी प्रकरणावरून राऊतांचा निशाणा
By जयदीप दाभोळकर | Published: January 22, 2021 10:13 AM
चॅट लीक प्रकरणी केंद्रातील सरकार गप्प का?, राऊत यांचा सवाल
ठळक मुद्देचॅट लीक प्रकरणी केंद्रातील सरकार गप्प का?, राऊत यांचा सवालकेंद्रात अन्य पक्षाचं सरकार असतं तर भाजपानं तांडव केला असता, राऊतांचा आरोप