UPA मधील कोणाचाही अध्यक्षपदासाठी विरोध नाही; काँग्रेसबाहेरील नेत्यानं अध्यक्ष व्हावं : संजय राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 02:57 PM2021-03-25T14:57:52+5:302021-03-25T15:01:47+5:30
Sanjay Raut on UPA : UPA सध्या विकलांग अवस्थेत संजय राऊत यांचं रोखठोक मत
युपीए अधिक मजबूत व्हायला पाहिजे ही काँग्रेस पक्षातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांची भूमिका आहे. किंबहुना ती सोनिया गांधी यांचीही भूमिका असू शकते. सोनिया गांधी यांनी प्रदीर्ध काळ युपीएचं नेतृत्व खंबीरपणे केलं आहे. परंतु सध्या त्यांची तब्येत बरी नाही," असं वक्तव्य शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलं.
"सध्या देशात वेगळ्याप्रकारे सुरू आहेत. अशावेळी युपीएचं नेतृत्व काँग्रेसच्या बाहेरील नेत्यानं करावं ही अनेक राज्यांतील प्रादेशिक पक्षांचीही मागणी आहे. आज युपीएही विकलांग अवस्थेत आहे," असंही रोखठोक मत राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं. शरद पवार यांच्या मागे किती आमदार किंवा खासदार आहेत याचा हा प्रश्न नाही. संपूर्ण देशात जितके भाजप सोडून पक्ष आहेत जे आज युपीएमध्ये सामील नाहीत या सर्वांची ही एक मागणी आहे की युपीएचं पुनर्गठन झालं पाहिजे. युपीएच्या नेतृत्वात जर बदल झाले तर युपीए अधिक मजबूत होईल, असंही ते म्हणाले.
""देशातील विरोधी पक्षांची आघाडी मजबूत करायची असेल आणि यात जास्तीत जास्त प्रादेशिक पक्षांचा सहभाग असावा असं वाटत असेल तर युपीएचं नेतृत्व शरद पवार यांनी करावं. ही आमची वैयक्तिक मागणी नाही. शरद पवार हे युपीएचे प्रमुख बनतील का नाही हे मी सांगू शकत नाही. मी माझं मत लोकांचं मत सांगितलं. आम्ही दिल्लीत एकमेकांना भेटतो त्यावेळी चर्चा होतात. सध्या अधिवेशनही सुरू आहे. यात प्रामुख्यानं युपीएचं पुनर्गठन व्हावं ही चर्चा होत असते. जर तर ज्या गोष्टीत दम नाही. युपीएचं नेतृत्व अशा नेत्याच्या हाती असावं जे बगैर भाजप पक्षांना एकत्र घेऊन संघटना बनवतील," असंही ते म्हणाले.