काँग्रेसचा शिवसेनेला धक्का, नाना पटोलेंच्या उपस्थितीत सेनेच्या बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 10:16 PM2021-05-04T22:16:38+5:302021-05-04T22:17:30+5:30

Politics News : २०१९ मध्ये  विजय पाटील यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेचे विधानसभेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.

Shiv Sena leader Vijay Patil from Vasai joins Congress in the presence of Nana Patole | काँग्रेसचा शिवसेनेला धक्का, नाना पटोलेंच्या उपस्थितीत सेनेच्या बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेसचा शिवसेनेला धक्का, नाना पटोलेंच्या उपस्थितीत सेनेच्या बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Next

वसई - महाविकास आघाडीमधील घटकपक्ष असलेल्या काँग्रेसने वसईमध्ये शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून लढणारे विजय पाटील यांनी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. (Shiv Sena leader Vijay Patil from Vasai joins Congress in the presence of Nana Patole)

२०१९ मध्ये  विजय पाटील यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेचे विधानसभेचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र आता त्यांचा भ्रमनिरास झाल्याने पूर्वाश्रमीचे काँग्रेस नंतर बविआ आणि नंतर शिवसेनेत गेलेल्या विजय पाटील यांनी आज मंगळवारी संध्याकाळी काँग्रेस पक्षात घरवापसी केली. या पक्षप्रवेशाची माहिती माहिती काँग्रेसचे जिमी घोन्सालविस यांनी लोकमतला दिली आहे. 

दरम्यान मंगळवारी संध्याकाळी मुंबईत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसचे पालघर जिल्ह्यातील निवडक पदाधिकारी व किसान  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्ठे आदींच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.

पालघर लोकसभा खासदारकीचा उमेदवार म्हणून हा पक्ष प्रवेश झाला असल्याची जोरदार चर्चा आता राजकीय वर्तुळात आहे. विशेष म्हणजे वसईचे आमदार आणि बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्यासमोर शिवसेना उमेदवार म्हणून पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती.  आता नाना पटोले यांनी काँग्रेस प्रवेश केल्यानंतर त्यांना पालघर जिल्हा अध्यक्ष केले आहे.  

Web Title: Shiv Sena leader Vijay Patil from Vasai joins Congress in the presence of Nana Patole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.