मुंबई: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेवरून महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्षात जुंपली आहे. गोस्वामी यांच्यावरील कारवाई सूडबुद्धीनं होत असल्याचा आरोप भाजपच्या अनेक नेत्यांनी केला. अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध करत ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी केली. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गोस्वामींची अटक कायदेशीर पद्धतीनंच झाल्याचा दावा केला."गोस्वामी भाजप कार्यकर्ते आहेत का? मग त्यांच्यासाठी भाजपकडून इतकी आरडाओरड कशासाठी?"केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनीदेखील राज्य सरकारच्या कारवाईवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे सरकारची कारवाई आणीबाणीची आठवण करून देणारी असल्याचं शहांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. शहांच्या टीकेला शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अर्णब गोस्वामींच्या अटकेचा पत्रकारितेच्या स्वातंत्र्याशी संबंध काय?, असा थेट सवाल सावंत यांनी विचारला आहे. एका व्यवसायिकेचे पैसे बुडवल्यानं आणि त्या व्यवसायिकानं आत्महत्या केल्यानं गोस्वामींना अटक झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी आधी माहिती घ्यावी आणि मग बोलावं, अशा शब्दांत सावंत यांनी सुनावलं आहे.अन्वय नाईक कोण होते?, त्यांची आत्महत्या आणि अर्णब गोस्वामींचं कनेक्शन काय?... वाचाशहांचं महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र'काँग्रेसचे आणि त्यांच्या मित्र पक्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीला लाज आणली. रिपब्लिक टीव्ही आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात सत्तेचा गैरवापर करून झालेली कारवाई व्यक्तीस्वातंत्र्य आणि लोकशाहीवरीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला आहे. यामुळे मला आणीबाणीची आठवण येते. माध्यमांच्या स्वातंत्र्यावरील या हल्ल्याचा निषेध व्हायला हवा आणि तो होईलच,' अशा शब्दांत शहांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
अर्णब यांच्या अटकेवरून अमित शहा कडाडले; शिवसेना खासदाराने मोजक्या शब्दांत सुनावले
By कुणाल गवाणकर | Published: November 04, 2020 3:51 PM