शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
3
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
4
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
5
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
6
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
8
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
9
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
10
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
11
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
12
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
13
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
14
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
15
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
16
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
17
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
18
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
19
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
20
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

जुनी थडगी आम्ही उकरली तर...; संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांना इशारा

By कुणाल गवाणकर | Updated: November 14, 2020 10:52 IST

मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करणाऱ्या सोमय्यांचा राऊत यांच्याकडून समाचार

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती हल्ले करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. किरीट सोमय्यांकडे त्यांचा पक्षही गांभीर्यानं पाहत नाही. आपल्या कृतींमुळे आपलाच पक्ष गाळात जातोय, याचं भान त्यांनी ठेवायला हवं. सोमय्यांनी उगाच खोटे आरोप करू नयेत, असं राऊत म्हणाले. त्यांनी दिवाळीनिमित्त पत्रकारांशी संवाद साधत राज्यातल्या जनतेला शभेच्छा दिल्या.सोमय्या यांची ठाकरे सरकारविरुद्ध पुन्हा आरोपबाजी; उच्च न्यायालयकडे दाद मागणारअन्वय नाईक आणि त्यांच्या कुटुंबानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, शिवसेना नेते रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनिषा वायकर यांना जमीन विकल्याची कागदपत्रं सोमय्यांनी पत्रकार परिषदेत दाखवली. ठाकरे आणि वायकर कुटुंबं एकत्र का आली, त्यांचे भागिदारीत असे किती व्यवसाय आहेत, मुख्यमंत्री ठाकरे याची माहिती जनतेला देणार का, अशी प्रश्नांची सरबत्ती सोमय्यांनी पत्रकार परिषदांमधून केली. त्याला राऊत यांनी आज प्रत्युत्तर दिलं. आम्ही बोलावं असं कोणतंही महान काम सोमय्यांनी केलेलं नाही. जुनी थडगी आम्हालाही उकरता येतात. तशी ती उकरली गेली तर त्या थडग्यांमध्ये तुमचेच सांगाडे जास्त सापडतील, असा इशारा राऊत यांनी दिला.'भाजपा नेत्याचं ट्विट, भाषा सांभाळून वापर परब, नाहीतर उलटे फटके पडतील'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनकल्याणाचं काम करत आहेत. गेल्या वर्षभरापासून राज्यावर संकटं येत आहेत. कोरोना, निसर्ग चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, त्यामुळे आलेला पूर, शेतीचं झालेलं नुकसान अशी संकटांची मालिका सुरू आहे. त्याला मुख्यमंत्री धैर्यानं तोंड देत आहेत. पुढील ४ वर्षे ते राज्यातल्या विकासासाठी अविरत काम करतील, असं राऊत म्हणाले.'किरीट सोमय्यांच्या डोक्यावर परिणाम, ठाण्यात दाखवून शॉक दिला पाहिजे' महाविकास आघाडी सरकार आपोआप पडेल, अशी विधानं करणाऱ्या विरोधकांचा राऊत यांनी समाचार घेतला. 'ऑपरेशन लोटसची चर्चा वर्षभर ऐकली. सरकार पाडण्यासाठी अघोरी प्रयत्न झाले. मात्र सरकारला काहीही झालं नाही. त्यामुळे आता विरोधकांनी ऑपरेशनची भाषा करू नये. गेल्या वर्षभरात अनेकदा ऑपरेशनचे प्रयत्न करूनही सरकारला साधं खरचटलंसुद्धा नाही. त्यामुळे विरोधकांनी विधायकं कामांकडे लक्ष द्यावं,' असा सल्ला राऊत यांनी दिला.

टॅग्स :Kirit Somaiyaकिरीट सोमय्याSanjay Rautसंजय राऊत