शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

सुधीरभाऊ उत्तम विनोद करतात, त्यांचे कार्यक्रम ठेवले तर...; संजय राऊतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 10:41 AM

sanjay raut hits back at bjp leader sudhir mungantiwar: तीन महिन्यांत सत्ताबदल होण्याचे संकेत देणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांचा शिवसेनेकडून समाचार

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल विधानसभेत बोलताना तीन महिन्यांनंतर राज्यात सत्ताबदल होण्याचे संकेत दिले. मुनगंटीवार यांच्या विधानानं विधिमंडळात उपस्थित असलेल्या साऱ्यांच्या भुवया उंचावल्या. आता मुनगंटीवारांच्या विधानाला शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सुधीर मुनगंटीवार उत्तम विनोद करतात. त्यांचे कार्यक्रम ठेवल्यास ते तुफान चालतील, असा टोला राऊत यांनी लगावला. संजय राऊत मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. (sanjay raut hits back at bjp leader sudhir mungantiwar)तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है; मुनगंटीवारांच्या वाक्यानं कान टवकारले, भुवया उंचावल्यासरकार ५ वर्षांचा कालावधी पूर्ण करणारच, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला. सरकार अतिशय मजबूत आहे. सरकारचं कामकाज योग्य दिशेनं सुरू आहे. त्यामुळे विरोधकांनी पुढील साडे तीन वर्ष त्यांचं काम करत राहावं. सरकारची चिंता सुधीर मुनगंटीवार यांनी करू नये, असं राऊत म्हणाले. लॉकडाऊनमध्ये लागू असलेले निर्बंध हळूहळू शिथिल होत आहेत. नाटकांचे प्रयोग सुरू झाले आहेत. काही निर्मात्यांनी मला मदतीसाठी फोन केले होते. पण मुनगंटीवारांचे कार्यक्रम ठेवल्यास ते तुफान चालतील, असा चिमटा त्यांनी काढला.सुधीर मुनगंटीवार अडचणीत; ३३ कोटी वृक्ष लागवडीच्या चौकशीसाठी सर्वपक्षीय 16 आमदारांची समिती जाहीरराज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. हा महासिनेमा पाच वर्ष चालेल. महाविकास आघाडीचा महासिनेमा असल्यानं त्यात खलनायकही चांगले हवेत, असं म्हणत राऊत यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना टोला हाणला. सामनात अग्रलेख आला म्हणजे घाव वर्मी बसला, अशी टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनादेखील त्यांनी प्रत्युत्तर दिलं. फडणवीस सामना वाचतात. सामना वाचणं ही चांगली सवय आहे. त्यासाठी मी त्यांचं कौतुक करतो, असं राऊत म्हणाले. सरकारमध्ये काँग्रेस नाराज आहे का, असं विचारलं असता, सर्वात आनंदी काँग्रेस पक्षच आहे. हवं तर तुम्ही त्यांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना विचारा, असं उत्तर राऊत यांनी दिलं.

काय म्हणाले होते सुधीर मुनगंटीवार? देशमुखांसोबत कशी जुंपली?काल विधानसभेत विदर्भाच्या दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली. सुधीर मुनगंटीवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी एकमेकांवर शेरोशायरीच्या माध्यमातून हल्ला चढवला. देशमुख म्हणाले, सुधीरभाऊ तुम्हाला बघून मला जगजीत सिंग यांची गझल आठवते. ‘तुम इतना जो मुस्करा रहे हो, सुधीरभाऊ, तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसे छुपा रहे हो.’ देशमुख गझल ऐकवत असताना सुधीर मुनगंटीवार गालातल्या गालात हसत होते.यानंतर मुनगंटीवार यांनी शेर सादर करत देशमुखांना चोख प्रत्युत्तर दिलं. ‘कुछ देर की खामोशी है, फिरसे शोर आयेगा, तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, हमारा दौर फिरसे आयेगा,’ असं मुनगंटीवार यांनी म्हणताच भाजपच्या आमदारांनी बाकं वाजवून त्यांचं स्वागत केलं. पण सुधीर मुनगंटीवार यांनी हा शेर सादर केल्यानंतर विधानसभेत एकच चर्चा रंगली. तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, असं मुनगंटीवार का म्हणाले? महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपच्या हालचाली सुरू आहेत का?, अशी उलटसुलट चर्चा विधानसभेत सुरू झाली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेAnil Deshmukhअनिल देशमुख