शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

काँग्रेसच्या स्वबळाच्या भाषेला सेना-राष्ट्रवादी युतीचा उतारा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 08:15 IST

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी, ‘शिवसेनेने वा राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची भाषा कधीही केलेली नाही. आम्ही एकत्र लढलो तर चमत्कार होईल,’ अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच विधानसभेची निवडणूकही काँग्रेस स्वबळावर लढेल, असे विधान केल्यानंतर आता शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत युती करून निवडणुका लढविण्याचे सुतोवाच केले आहे.

शिवसेनेच्या मुखपत्रात गुरुवारी याबाबतचे भाष्य करण्यात आले आहे. ‘स्वबळावर लढून सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न करणे यात चुकीचे काय? भाजप व काँग्रेससारखे पक्ष त्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत हे चांगलेच झाले. आता महाराष्ट्रात राहिले दोनच पक्ष, शिवसेना व राष्ट्रवादी. सगळेच स्वबळावर लढणार असतील तर या दोन प्रमुख पक्षांना महाराष्ट्र हिताचा विचार करून एकत्र लढावे लागेल’ असे या मुखपत्राच्या अग्रलेखात म्हटले आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांनी शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे सूतोवाच आधीच केले असल्याची पुस्तीही त्यात जोडली आहे.

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी, ‘शिवसेनेने वा राष्ट्रवादीने स्वबळावर लढण्याची भाषा कधीही केलेली नाही. आम्ही एकत्र लढलो तर चमत्कार होईल,’ अशी प्रतिक्रिया पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, स्वबळावर लढण्याचे पटोले यांनी सूतोवाच करणे यात गैर काहीही नाही. प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. भाजप सत्तेत येणे हे देशाच्या, राज्याच्या हिताचे नाही या भूमिकेतून तीन पक्ष एकत्र आले. आम्ही योग्यवेळी योग्य तो निर्णय घेऊ.

तिघांनी अधिक संघटितपणे काम करावे - जयंत पाटीलn राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, सत्तेतील तिन्ही पक्षांनी एकत्र राहावे याला सर्वांनीच प्राधान्य दिले पाहिजे. n त्यातूनच एखाद्या पक्षाला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्र राहतील असे मत शिवसेनेच्या मुखपत्रात व्यक्त केले आहे. n राज्यातील जनतेचीही तशीच इच्छा दिसते. प्रत्येक पक्षाचे बळ किती आहे हे महाराष्ट्रात सर्वांनाच माहित आहे. म्हणून तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटितपणाने काम करणे अपेक्षित आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसNana Patoleनाना पटोलेSanjay Rautसंजय राऊत