मुंबई: केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरू असून, मुंबई, वसई-विरारनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा कोकणात दाखल झाली आहे. रायगडमधील महाड येथे पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना नारायण राणे यांची जीभ घसरली. यानंतर शिवसेनेकडूनही नारायण राणे यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले असून, केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर नारायण राणेंचे मानसिक संतुलन बिघडले आहे, असा पलटवार करण्यात आले आहे. (shiv sena replied narayan rane over criticism on cm uddhav thackeray in jan ashirwad yatra)
“मी असतो तर कानाखाली चढवली असती”; मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली
नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेवेळी महाड येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर राणे यांनी जोरदार प्रहार केला. मात्र, टीका करण्याच्या नादात राणे यांनी वादग्रस्त विधान केले. महाराष्ट्रात यांच्यामुळे एक लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला, मात्र काही उपाय नाही. लस नाही, डॉक्टर नाहीत, वैद्यकीय कर्मचारी नाहीत. भयावह परिस्थिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाची होती. यांना बोलायचा अधिकार तरी आहे का? अपशकुनासारखे बोलू नको म्हणावे. बाजूला एखाद सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती, असे नारायण राणे म्हणाले. यावर शिवसेनेने जशास तसा पलटवार केला आहे.
“१४ महिने मंत्रालयात न येणारा मुख्यमंत्री उत्कृष्ट कसा काय?”; भाजपची विचारणा
नारायण राणेंचे मानसिक संतुलन बिघडलंय
स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी नेहमीच चाटुगिरीची सवय लागलेल्या नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांचं मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडले आहे. पण एक लक्षात ठेवावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेनेचे इतर कोणतेही नेते असतील, त्यांच्याबद्दल अशा प्रकारे वक्तव्य करणाऱ्याचे हात छाटायची ताकद आम्हा मावळ्यांमध्ये आहे हे त्यांनी कदापि विसरता कामा नये, असे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे.
“दहीहंडी होणारच; घरात बसून सबुरीचे आम्हाला नकोत”; भाजपचा एल्गार
नारायण राणे यांचा आता फुगा फाटला
नारायण राणे यांचा आता फुगा फुटलेला आहे. ते ऑक्सिजनवर आहेत. सामान्य शिवसैनिकांनीच त्यांचा फुगा फोडलेला आहे. आता दिल्लीश्वरांच्या समोर मुजरा करण्यापलिकडे त्यांना कोणतेही काम राहिले नाही. त्यांना आता एकच जबाबदारी दिली आहे. उद्धव ठाकरे, मातोश्री आणि शिवसेनेवर टीका करा, हेच त्यांचे ऑक्सिजन आहे. हे त्यांनी केले नाही तर त्यांचे मंत्रिपद जाणार आहे. त्यामुळे मंत्रिपद टिकवण्यासाठी त्यांना हे करावच लागणार. त्यामुळे नारायण राणे काय करत आहेत याची आम्हाला अजिबात चिंता नाही, या शब्दांत मनिषा कायंदे यांनी टीकास्त्र सोडले आहे.
Vi चे आता BSNL मध्ये विलिनीकरण होणार? मोदी सरकारने स्पष्ट केली भूमिका
दरम्यान, मला कोकणात रिफायनरी व्हायला हवी आहे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. एका रिफायनरीमुळे कोकणात दीड लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. एक नवीन शहर विकसीत होणार आहे. या प्रकल्पाबरोबरच शाळा, रुग्णालय, कॉलेजही येणार आहे. यामुळे येथील विकासाला गती मिळणार आहे, असे नारायण राणे म्हणाले. तसेच ठेकेदारांच्या निष्क्रीयतेमुळे मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडल्याचा दावाही त्यांनी केला.